२१ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 20:15 IST2023-11-28T20:14:59+5:302023-11-28T20:15:09+5:30

समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

A 21-year-old youth was stabbed to death | २१ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून

२१ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून

पुणेपुण्यात २१ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. महेश डोके असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, तो वाघोली येथील एका महाविद्यालयामध्ये तो शिकत होता आणि वाढीबोलाही येथे एका होस्टेलमध्ये राहायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय मुलावर कोयत्याने वार करण्यात आले. घटनेनंतर तातडीने जखमीस रुग्णालयात नेले, डॉक्टरांनी त्याला त्याला पुढे ससून रुग्णालयात रेफर केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सदर युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता व वाढेबोलाही येथे एका होस्टेलमध्ये राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तपासा दरम्यान समोर आलेल्या बाबीनुसार ही हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु नेमक्या कारणाचा अजूनही शोध घेतला जात आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

Web Title: A 21-year-old youth was stabbed to death