Pune | पुण्यात जुन्या भांडणावरून १५ वर्षांच्या मुलावर ब्लेडने केले वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 19:34 IST2023-01-11T19:34:35+5:302023-01-11T19:34:51+5:30
हा प्रकार वडगाव शेरीमधील गलांडेनगरमध्ये घडला...

Pune | पुण्यात जुन्या भांडणावरून १५ वर्षांच्या मुलावर ब्लेडने केले वार
पुणे : जुन्या भांडणावरून शाळकरी मुलांनी एका १५ वर्षांचा मुलगा आणि त्याचा मित्र अशा दोघांवर ब्लेडने वार करून जखमी केले. याप्रकरणी चंदननगरमधील बोराटे वस्तीत राहणाऱ्या एका पालकाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरीमधील गलांडेनगरमध्ये घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १५ वर्षांच्या मुलाचे तीन महिन्यांपूर्वी एका मुलाशी भांडण झाले होते. फिर्यादीचा मुलगा मित्रांबरोबर मदर तेरेसा शाळेतून चालत घरी येत होते. ते बसस्टॉपजवळ आले असताना त्यांच्या शाळेत शिकणारा मुलगा व त्याचे तीन मित्र तेथे आले. त्यांनी फिर्यादीचा मुलगा व त्याच्या मित्रावर ब्लेडने वार करून जखमी केले. त्यातील एकाने फिर्यादीच्या मुलाला कमरेच्या पट्ट्यांनी मारहाण केली. सहायक फौजदार ढावरे तपास करीत आहेत.