Pune: मोबाइल न दिल्याने दहावीतील मुलीची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 11:35 IST2023-10-13T11:31:08+5:302023-10-13T11:35:01+5:30

देहू येथे बुधवारी (दि. ११) रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली....

A 10th class girl committed suicide by jumping from the seventh floor due to not being given a mobile phone | Pune: मोबाइल न दिल्याने दहावीतील मुलीची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Pune: मोबाइल न दिल्याने दहावीतील मुलीची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पिंपरी : मोबाइल दिला नाही म्हणून दहावीतील १५ वर्षीय मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. देहू येथे बुधवारी (दि. ११) रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.

आर्या गणेश सावंत (रा. अभिलाषा हाऊसिंग सोसायटी, देहू) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे सांगोला येथील असलेले आर्या हिचे वडील गणेश सावंत आणि आई साॅफ्टवेअर इंजिनिअर आहेत. सावंत दाम्पत्याला दोन मुली होत्या. त्यात आर्या मोठी मुलगी होती. बुधवारी आर्याने मोबाइल मागितला. मात्र, आई-वडिलांनी मोबाइल देण्यास नकार दिला. त्यामुळे तिने घराच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: A 10th class girl committed suicide by jumping from the seventh floor due to not being given a mobile phone