शनिवारी आढळ‌ले ९६३ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST2021-03-07T04:11:15+5:302021-03-07T04:11:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ सुरूच असून शनिवारी (दि.६) दिवसभरात ९६३ रुग्णांची वाढ झाली. बरे ...

963 corona found on Saturday | शनिवारी आढळ‌ले ९६३ कोरोनाबाधित

शनिवारी आढळ‌ले ९६३ कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ सुरूच असून शनिवारी (दि.६) दिवसभरात ९६३ रुग्णांची वाढ झाली. बरे झालेल्या ६५९ रुग्णांना शनिवारी घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांतील ३२१ कोरोना रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण सक्रिय रुग्णसंख्या ६ हजार ४६० झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३२१ जणांची प्रकृती चिंताजनक असून ६७२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ८८५ झाली आहे.

दिवसभरात एकूण ६५९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ९६ हजार १ झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २ लाख ७ हजार ३४६ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ४६० झाली आहे. दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ७ हजार ६०९ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत एकूण ११ लाख ८५ हजार २५९ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: 963 corona found on Saturday