Pune Corona News: शहरात रविवारी ९५ नवे कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 19:45 IST2021-11-21T19:45:19+5:302021-11-21T19:45:28+5:30
आज दिवसभरात ४ हजार १७१ जणांची तपासणी करण्यात आली

Pune Corona News: शहरात रविवारी ९५ नवे कोरोनाबाधित
पुणे : शहरात रविवारी ९५ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, ७५ कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ४ हजार १७१ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत बधितांची टक्केवारी २.२७ टक्के आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज ४ जणांचा मृत्यू झाला असून २ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील विविध रूग्णालयांत सध्या १०२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ७८ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
शहरात आतापर्यंत ३६ लाख ४८ हजार २८९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातले ५ लाख ५ हजार ९६१ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ९५ हजार ९९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत शहरात ९ हजार ९६ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ८६७ इतकी आहे.