इंदापूर शहरात ९० हजाराचा अवैध गुटखा पानमसाला जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 20:31 IST2021-03-23T20:31:48+5:302021-03-23T20:31:59+5:30
इंदापूर शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

इंदापूर शहरात ९० हजाराचा अवैध गुटखा पानमसाला जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.
बाभुळगाव : इंदापूर शहरात अवैध गुटखा पानमसाला विक्री होत असलेल्या दुकानातील गुटखा साठ्यावर पूणे येथील अन्न व औषध प्रशासन विभाग अधिकार्यांनी छापा टाकून नव्वद हजार दोनशे रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
याप्रकरणी फिर्याद अन्न व औषध प्रशासन अधिकारी शुभांगी बाळकृृृष्ण अंकुश यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान हुसेन शेख.(वय ३४,रा.चाळीस फुटी रोड,इंदापूर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
सोमवारी (दि.२२) शेख इंटरप्राईजेस इंदापूर येथे दुकानाची तपासणी केली असता आरोपीच्या दुकानात जवळपास ९० हजार २१६ रुपयांचा आढळून आलेला गुटखा ताब्यात घेतला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांना जप्त केलेला साठा दुकानदाराने नेमका कुठून आणला याची माहिती उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे इम्रान शेख याच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला इंदापूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला. आणि उत्पादक व पुरवठादाराचा तपास व्हावा यासाठी हा गुन्हा इंदापूर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
————————————————————————