शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक जवानाचा गणवेश खरेदी करणार ९ हजारांना

By admin | Updated: May 20, 2015 01:03 IST

अग्निशामक दलातील ४०७ कर्मचाऱ्यांना गणवेश पुरविण्यासाठी ३८ लाख रुपयांच्या टेंडरला स्थायी समितीकडून गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

पुणे : अग्निशामक दलातील ४०७ कर्मचाऱ्यांना गणवेश पुरविण्यासाठी ३८ लाख रुपयांच्या टेंडरला स्थायी समितीकडून गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. ५ वर्षांनंतर अग्निशामकच्या जवानांना गणवेश दिला जात असून, त्याकरिता अत्यंत महागडे टेंडर मंजूर करण्यात आले आहे. मुंबईतील काळबादेवी येथे आगीची दुर्घटना घडून तिघा अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागल्यानंतर पुण्यातील अग्निशामक जवानांना गणवेश पुरविण्यासाठी गडबडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. अग्निशामकच्या जवानांना गणवेश पुरविण्यासाठी जाहिरात काढली असता ४ टेंडर आले. त्यामध्ये पूनम फर्मचा ३२ लाख ३ हजार, तर विधी ट्रेडिंगचा ३७ लाख ३९ हजार रुपयांची निविदा आली आहे. त्यानुसार त्यांच्याशी करार करून गणवेश पुरविण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. स्थायी समितीच्या बैठकीत ३८ लाख रुपयांचा करार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुणे अग्निशामक दलामध्ये २९७ फायरमन, २७ तांडेल, ६० मोटार सारथी, २३ अ‍ॅम्ब्युलन्स अटेडन्स अशा ४०७ जवानांना गणवेश पुरविला जाणार असल्याचे करारामध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले, ‘‘मागील वेळेस ठेकेदाराने अग्निशामक जवानांना अर्धवट गणवेश पुरविल्याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारण्यात आला होता. तसेच या वेळी सर्वांना एकाच वेळी संपूर्ण गणवेश पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.’’मागील वेळेस ठेकेदाराने अग्निशामक जवानांना अर्धवट गणवेश पुरविल्याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारण्यात आला. तसेच या वेळी सर्वांना एकाच वेळी संपूर्ण गणवेश पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- अश्विनी कदम, स्थायी समिती अध्यक्षा ४महापालिकेने २०११ मध्ये निविदाप्रक्रिया राबवून नागपूरच्या एका ठेकेदारास गणवेश पुरविण्याचा ठेका दिला होता.४जवानांना एका वेळी दोन गणवेशाचे संपूर्ण सेट त्याने पुरविणे आवश्यक होते. मात्र ठेकेदाराने शर्ट, पँट त्यानंतर कोट, बूट असा सुटा गणवेश पुरविला. त्यामुळे काही जवानांना शर्ट, पँट मिळाली पण कोट मिळाला नाही. ४काही जणांना बूट मिळाला, पण टोपी मिळाली नाही. हा गणवेश पुरविण्यास त्याने दीड ते दोन वर्षांचा कालावधी घेतला.