शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - नाशिक महामार्गावरील अपघातात ९ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:57 IST

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो

पुणे: पुणे - नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मागून येणाऱ्या एका ट्रकने एका कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर कार ही एका एसटी बसवर जाऊन आदळली. या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. 

फडणवीस म्हणाले, पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे.

असा झाला अपघात 

पुणे - नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळील मुक्ताई ढाब्यानजीक हा भीषण अपघात सकाळी दहाच्या सुमारास झाला. सकाळी नाशिकहून पुण्याच्या मार्गाने जाणाऱ्या एसटी बसचा नारायणगावजवळ ब्रेक फेल झाला. त्यामुळे ती एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी मागून प्रवासी वाहतूक करणारी एक मॅक्झिमो गाडी येत होती. त्याच्या पाठीमागून एक आयशर ट्रक भरधाव वेगाने येत होता. भरधाव आयशरने प्रवासी असलेल्या मॅक्झिमो गाडीला भीषण धडक दिली. त्यानंतर मॅक्झिमो गाडी बंद पडलेल्या एसटीवर जोरात जाऊन आदळली. या मॅक्झिमो गाडीमध्ये जवळपास १३ प्रवासी होते. त्यातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मॅक्झिमा कारचा चक्काचूर झाला

अपघातानंतर आयशर ट्रकचा चालक पसार झाला आहे. हा ट्रक हरियाणा इथला असून त्याच्या चालकाचा शोध घेतला जात आहे. सकाळी अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी मदतकार्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. जखमींना सध्या नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आयशर आणि बसदरम्यान सापडल्याने मॅक्झिमा कारचा चक्काचूर झाला. प्रत्यक्षदर्शींना दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याची धडक मॅक्झिमोला बसली.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMONEYपैसा