शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Video: आळंदीत झाडावर लटकलेला ९ फुटी अजगर; पाहून थरकाप उडेल, वनविभागाची तातडीने कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:01 IST

वनविभागाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत अत्यंत सावधगिरीने अजगराला पकडले असून या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणालाही इजा झाली नाही

पुणे : आळंदी येथे 9 फुटी अजगर आढळल्याची घटना बुधवारी (23 एप्रिल) सकाळी उघडकीस आली. सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास आळंदी-वडगाव रोडवरील IGW कंपनी परिसरात झाडावर मोठा साप असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. यानंतर ही माहिती तात्काळ वन्यजीव रक्षक आकाश सूर्यवंशी यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता तो साप तब्बल 9 फुटी अजगर असल्याचे स्पष्ट झाले. परिसरात नागरिकांची गर्दी होऊ लागली होती, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवत अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने अजगराला पकडण्यात आले. या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणालाही इजा झाली नाही. यानंतर वन अधिकारी भाऊसाहेब इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अजगराला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे वन्य प्राणी आढळल्यास घाबरून न जाता त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 9-foot python found in Alandi tree; Forest dept rescues it.

Web Summary : A 9-foot python was found in a tree in Alandi. Forest officials promptly rescued the snake and released it back into its natural habitat, calming frightened locals.
टॅग्स :Alandiआळंदीsnakeसापforest departmentवनविभागenvironmentपर्यावरणNatureनिसर्गFamilyपरिवार