शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

यंदाही ८३३ रिक्षांना सीएनजी किटसाठी अनुदान मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 6:25 PM

शहरातील सुमारे ८३३ रिक्षांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत १ कोटीच्या खर्चास मान्यतागेल्या आठ वर्षात महापालिकेच्या वतीने तब्बल १६ हजार ५३४ परवाने धारक रिक्षांना अनुदान

पुणे : शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी महापालिकेकडून प्रोत्सहान देण्यात येते. यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून महापालिकेच्या वतीने सीएनजी किटसाठी अनुदान देण्यात येते. यंदा देखील हे अनुदान देण्यासाठी १ कोटी रुपयांच्या खर्चांस मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामधून शहरातील सुमारे ८३३ रिक्षांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी सांगितले.     गेल्या काही वर्षांत शहराची प्रदुषणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. या प्रदुषणामध्ये  शहरातील वाढती वाहन संख्या कारणीभूत आहे. यामुळेच महापालिकेच्या वतीने शहरातील खाजगी रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रोत्सहान देण्यात येत आहे. गेल्या आठ वर्षात महापालिकेच्या वतीने तब्बल १६ हजार ५३४ परवाने धारक रिक्षांना अनुदान दिले आहे. त्यात यंदा यासाठी एक कोटीची तरतूद उपलब्ध असल्यामुळे यामधून ८३३ रिक्षांना अनुदानाचा लाभ होणार आहे     १७ जून २०१७ पासून आरटीओ मार्फत नवीन परमिट खुले केले असल्याने नवीन रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे .या सर्व नवीन रिक्षांमध्ये कंपनीमार्फत फॅक्टरी  सीएनजी किट आहे .तसेच १८ जुलै २०१७ पासून सर्व नवीन रिक्षकांना आरटीओ रजिस्ट्रेशन साठी सीएनजी असणे बंधनकारक झाले आहे . त्यामुळे २०१४ पूर्वीच्या आरटीओ रजिस्ट्रेशन असलेल्या रिक्षांना अनुदानासाठी अर्ज करता येणार आहे.  सीएनजी किट  अनुदान वाटपाच्या अर्ज आॅनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे. जुन्या रिक्षावर एकदा सीएनजी किटसाठी अनुदान घेतलेल्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. सीएनजी किटसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर हे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, असे स्थायीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी सांगितले. ------- आतापर्यंत देण्यात आलेले अनुदानवर्ष        अर्थिक तरतुद               अनुदान मिळालेल्या रिक्षा  २०११ -१२        २ कोटी               १६५१ २०१२ -१३       २ कोटी                                  ८७३२ २०१३- १४       २ कोटी                               १६५० २०१४ -१५       २ कोटी ५९ लाख               २१६४  २०१५ -१६       १ कोटी ४४ लाख              ११४० २०१६-  १७       ४२ लाख ५० हजार             ३५४  २०१७- १८         २५ लाख                       २०८२०१८ -१९           १ कोटी                          ६२८   

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका