शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

दाम्पत्याने जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी काढलेली आठ लाखांची रोकड लंपास

By नम्रता फडणीस | Updated: March 12, 2024 15:51 IST

पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरु

पुणे : जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी बँकेतून काढलेली दाम्पत्याकडील आठ लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत सुरेश नामदेव खंकाळ (वय ४५, रा. जयसिंग हाऊसजवळ, देहूरोड) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंकाळ पुणे स्टेशन परिसरातील एका रुग्णालयात कामाला आहेत. खंकाळ दाम्पत्य जमीन खरेदी करणार होते. व्यवहारासाठी त्यांनी बँकेतून आठ लाख १६ हजार रुपये काढले. पैसे पिशवीत ठेवून खंकाळ दाम्पत्य सोमवारी दुपारी दुचाकीवरुन नगर रस्त्यावरील खराडी बायपास चौकातून केशवननगरकडे निघाले होते. चोरटे त्यांच्या मागावर होते. आर. के. बिअर शाॅपीसमोर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी खंकाळ यांच्याकडील रोकड ठेवलेली पिशवी चोरून नेली. चोरटे मुंढव्याकडे पसार झाले. पिशवीत आठ लाख १६ हजारांची रोकड, आधारकार्ड, धनादेश पुस्तिका असा मुद्देमाल होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्तविजयकुमार मगर, सहायक आयुक्त संजय पाटील, पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, उपनिरीक्षक तानाजी शेगर तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारMONEYपैसा