शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने थकविला आयआयईचा ८ कोटींचा निधी : डॉ. भालचंद्र मुणगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 20:11 IST

शिक्षणापासून वंचित, शोषित, बालकामगार, स्थलांतरीत, प्रौढ, अल्पसंख्यांक, दिव्यांग यांच्या तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाच्या समस्यांवर आयआयई ही संस्था कार्यरत आहे.

ठळक मुद्देदरवर्षी आयसर संस्थेकडून ४५ टक्के व राज्य शासनाकडून ४५ टक्के असे ९० टक्के अनुदान ८ वर्षांपासून अनुदानच मिळालेले नाही, त्यांच्याकडे ६ कोटी ९० लाख रूपयांची रक्कम थकितसंस्थेच्या विश्वस्त मंडळाबाबत तक्रार करण्यात आल्याने आयसर संस्थेने अनुदान बंद

पुणे : शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडियन इन्स्टिटयूट आॅफ एज्युकेशन (आयआयई) संस्थेला गेल्या ८ वर्षांपासून राज्यशासनाने तसेच आयसर संस्थेकडून एक वर्षांपासून निधी मिळालेला नाही. राज्य सरकारकडे ६ कोटी ९० लाख तर आयसरकडे १ कोटी २० अशी एकूण ८ कोटी १० लाख रूपयांची रक्कम थकित आहे. त्यामुळे संस्था अडचणीत आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिली.शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक व डॉ. चित्रा नाईक यांनी आयआयईची स्थापना करून त्याचे नेतृत्व केले. सामाजिक विज्ञान शाखांमध्ये आंतरशाखीय संशोधन करणारी आयआयई ही महत्त्वाची संस्था आहे. त्याचबरोबर शिक्षणापासून वंचित, शोषित, बालकामगार, स्थलांतरीत, प्रौढ, अल्पसंख्यांक, दिव्यांग यांच्या तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाच्या समस्यांवर ही संस्था कार्यरत आहे. मात्र राज्य शासनाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे आयआयई संस्था अडचणीत सापडली आहे. मुणगेकर म्हणाले, आयसर संस्थेकडून ४५ टक्के व राज्य शासनाकडून ४५ टक्के असे ९० टक्के अनुदान दरवर्षी संस्थेला मिळत असे. उर्वरित १० टक्के खर्च संस्थेकडून केला जातो. राज्य शासनाकडून गेल्या ८ वर्षांपासून अनुदानच मिळालेले नाही, त्यांच्याकडे ६ कोटी ९० लाख रूपयांची रक्कम थकली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या विश्वस्त मंडळाबाबत तक्रार करण्यात आल्याने आयसर संस्थेने अनुदान बंद केले. दोन्ही अनुदान बंद झाल्याने संस्था अडचणीत आली आहे. सध्या कार्यरत असलेले विश्वस्त मंडळ अधिकृत असल्याचा निर्णय धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे आयसर व राज्य शासनाकडून अनुदान मिळण्यास आता कोणतीही अडचण नाही.  आयआयईच्या १० पैकी ५ विश्वस्तांनी मागील वर्षी अचानक राजीनामे दिले. त्यामुळे संस्थेच्या विश्वस्त मंडळामध्ये केवळ ५ सदस्य उरले. संस्थेच्या घटनेनुसार कारभार पाहण्यासाठी किमान ७ विश्वस्तांचे मंडळ अस्तित्त्वात असणे बंधनकारक होते. त्यानंतर ५ विश्वस्तांनी मिळून नवीन ५ विश्वस्तांची नियुक्ती केली. त्याला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेचे काम पूर्वपदावर येत आहे असे मुणगेकर यांनी सांगितले. संस्थेच्या विश्वस्त तसेच पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कारभारात सुधारणा करायची असते. मात्र, त्यांनीच संस्थेचा कारभार योग्य नसल्याचे सांगत राजीनामे दिले, ही कृती अत्यंत चुकीची होती. त्यामुळे त्याचा फटका आयआयईला सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :PuneपुणेBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरState Governmentराज्य सरकारfundsनिधी