जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि १४६ गण निश्चित, नवीन गट रचनेत ५ तालुक्यात एका गटाची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:30 IST2025-06-13T19:30:29+5:302025-06-13T19:30:43+5:30

पुण्याची लोकसंख्या नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने गटाची दोन व गणांची संख्या चारने कमी

73 groups and 146 ganas of Zilla Parishad fixed, one group added in 5 talukas in new group structure | जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि १४६ गण निश्चित, नवीन गट रचनेत ५ तालुक्यात एका गटाची वाढ

जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि १४६ गण निश्चित, नवीन गट रचनेत ५ तालुक्यात एका गटाची वाढ

पुणे: राज्य शासनाने पुणेजिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी यापूर्वी २०२२ मध्ये निश्चित केलेली गट- गण रचना अंतिम केली असून, त्यासंदर्भातील अध्यादेश जाहीर केला आहे. या नवीन गट, गण रचनेनुसार आता पुणे जिल्हा परिषदेचे ७३ गट व १४६ गण निश्चित केले आहेत. दरम्यान, पुणे महापालिकेमध्ये हवेली व मुळशीतील २३ गावे समाविष्ट झाल्याने हवेली तालुक्यातील गटांची संख्या सातने कमी झाली असून, नवीन गट रचनेत जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटाची वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आणि कटक मंडळी वगळता ग्रामीण क्षेत्रामध्ये ३३ लाख ८८ हजार ५१३ ग्रामीण क्षेत्रात लोकसंख्या आहे. जिल्हा प्रशासनाने २०११ च्या जनगनणेप्रमाणे ही आकडेवारी शासनाकडे सादर केली होती. राज्य शासनाने जिल्हा परिषद गट आणि गण यांची संख्या २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे म्हणजेच पाच वर्षांचा कार्यकाळ संपला त्यावेळचा २०२२ च्या वेळी जी संख्या होती ती गटांची संख्या कायम ठेवली आहे. संपूर्ण राज्यासाठी जिल्हा परिषदांमध्ये जास्तीत जास्त ७५ आाणि कमीत कमी ५० गट असतील, तर त्या प्रत्येक गटामध्ये दोन पंचायत समितीचे गण असणार असल्याचे सांगण्यात आले होते.

रचनेत मोठे फेरबदल होणार

नव्याने कोणत्या तालुक्यात गट-गण वाढवता येतील याबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवीन नियमानुसार तालुकानिहाय ७३ गट व १४६ गणांची संख्या निश्चित केली आहे. यामध्ये लोकसंख्येची सरासरी काढून हे गट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात गट संख्येत वाढ झाली आहे. या तालुक्यात गट-गणांच्या रचनेत मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट झाले.

अडीच लाख लोकसंख्या घटली

ग्रामीण क्षेत्रामध्ये सन २०१७ ला ३६ लाख ९२ हजार लोकसंख्या होती. त्यानंतर पुणे महापालिकेमध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आला, तसेच वडगाव मावळ, देहू, मंचर आणि माळेगाव येथे नगरपंचायत झाल्याने ग्रामीण क्षेत्रातून अडीच लाख लोकसंख्या कमी झाली. यामुळे पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने गटाची दोन व गणांची संख्या चारने कमी झाली आहे, तर हवेली तालुक्यातील गट संख्या तब्बल सातने कमी झाली आहे.

जिल्ह्यातील गट-गणांमध्ये असे झाले फेरबदल

तालुका - नवीन गट - नवीन गण

जुन्नर - ८ - १६
आंबेगाव - ५ - १०
शिरूर - ७ - १४
खेड - ८ -१६
मावळ - ५ - १०
मुळशी - ३- ६
हवेली - ६ - १२
दौंड - ७ - १४
पुरंदर - ४ - ८
वेल्हा - २ - ४
भोर - ४ - ८
बारामती - ६ - १२
इंदापूर - ८ - १६

एकूण - ७३ - १४६

Web Title: 73 groups and 146 ganas of Zilla Parishad fixed, one group added in 5 talukas in new group structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.