शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

कँन्टोन्मेंटमध्ये ७ हजार कुटुंबे सर्वेक्षणाविनाच!

By admin | Updated: March 28, 2015 01:05 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षणात ६ हजार ९६० कुटुंबांचे सर्वेक्षण झालेले नाही.

पुणे : कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षणात ६ हजार ९६० कुटुंबांचे सर्वेक्षण झालेले नाही. तयार केलेल्या यादीबाबत आक्षेप असल्यास, काही बदल करावयाचे असल्यास नागरिकांना अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी १७ एप्रिलपर्यंत मुदत आहे. बोर्डाच्या हद्दीत सुमारे ६७ हजार ८८१ कुटुंबे आहेत. त्यापैकी ६० हजार ९२१ कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. उर्वरित ६ हजार ९६० कुटुंबांचे सर्वेक्षणच झालेले नाही. २०११ मध्ये केलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षणाच्या याद्या नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. बोर्डाच्या कार्यालयीन अधीक्षक चित्रा गोखले यांनी सांगितले, की सर्वेक्षणाच्या याद्या बोर्डाच्या मुख्यालयाबरोबरच सहा शाळांमध्ये ठेवल्या आहेत. वॉर्ड क्रमांक १ आणि २ मधील याद्या जुना मोदीखाना येथील रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळांमध्ये, वॉर्ड क्रमांक ३ आणि ४ मधील याद्या न्यू मोदीखाना येथील महर्षी अण्णासाहेब शिंदे प्राथमिक शाळेत उपलब्ध आहेत. वॉर्ड क्रमांक ५ मधील याद्या सोलापूर बाजारमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलमध्ये ठेवल्या आहेत. वॉर्ड सहामधील नागरिकांसाठी वानवडी बाजारमधील महादजी शिंदे हायस्कूल आणि वॉर्ड सातमधील नागरिकांसाठी घोरपडी गावातील घोरपडी व्हिलेज हायस्कूल या ठिकाणी याद्या पाहायला मिळणार आहेत. (प्रतिनिधी)फेरबदलासाठी करावा लागणार अर्ज४यादीतील तपशिलाबाबत फेरबदल करावयाचा असल्यास नागरिकांना आक्षेप अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी १७ एप्रिलपर्यंत मुदत आहे. आक्षेप अर्ज ९ मेपर्यंत निकालात काढले जाणार आहेत. ४निकालावर अपील करण्यासाठी ९ मे ते १७ मेपर्यंत मुदत आहे. यादीत समावेश नसलेल्या नागरिकांकडून नवीन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ६ जूनपर्यंत मुदत आहे. ८ जून रोजी यादी अंतिम होणार असल्याचे गोखले यांनी नमूद केले.