पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाने २ जुलैला रोजी पुणे शहरातील कोंढवा परिसरात मोठी कारवाई करत सुमारे १३,५०,०००/- रुपये किमतीचा ६७ ग्रॅम ‘मेफेड्रॉन (MD)’ हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कोंढवापोलिस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भाजी मंडईसमोर, कोंढवा, पुणे येथे एक इसम अंमली पदार्थासह असल्याचे कळले. त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून सुनील बिशनराम चौधरी (वय २० वर्ष, रा. गॅस गोडाऊन खडी मिशन चौक, रिलायन्स मार्ट मागे, जनसेवा बँकेसमोर, कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १३,५०,०००/- रुपये किंमतीचा ६७ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं. ५१५/२०२५ नुसार एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २१(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त विवेक मासाळ (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीकुमार नाईक, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, कैलास थोरात यांच्या पथकाने केली.