पुणे: मेट्रोला लागणाऱ्या एकूण विजेपैकी ६५ टक्के वीज सौर ऊर्जेतून मिळवण्यात येणार आहे. त्यासाठी मेट्रोची सर्व स्थानके, व्यापारी संकूले, डेपो यांच्या छतांवर सौर पँनेल्स बसवण्यात येणार आहेत.पुण्यात मेट्रोचे वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असे ३१ किलोमीटरचे दोन मार्ग आहेत. त्यातील स्वारगेट ते शिवाजीनगर हा ५ किमीचा भूयारी मार्ग वगळता २६ किमीच्या मार्गावर २५ स्थानके आहेत. त्या सर्व स्थानकांच्या छतांवर सौर पँनेल्स असतील. त्याशिवाय वनाज, स्वारगेट व पिंपरी चिंचवड येथील व्यापारी संकूल व मेट्रोच्या अन्य इमारतींवरही अशीच पँनेल्स असतील.
नागपूर मेट्रोमध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आला. तिथे या सौर पँनेल्समधून मोठ्या प्रमाणावर वीज तयार होते आहे. त्याचा वापर मेट्रो स्थानकांमधील विजेसाठी करण्यात येतो. पुण्यातही असाच प्रकल्प करण्यात येणार असून त्याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. हेमंत सोनवणे, संचालक, महामेट्रो (जनसंपर्क) (२१७)