Pune: गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची ६० लाखांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 11:09 AM2024-02-17T11:09:24+5:302024-02-17T11:10:21+5:30

या प्रकरणी बिल्डरसह त्याच्या कुटुंबियावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

60 lakh fraud of a senior woman with the lure of investment; A case has been registered against the builder | Pune: गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची ६० लाखांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल

Pune: गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची ६० लाखांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल

पुणे : गुंतवणुकीवर १ टक्का व्याज देण्याचे आमिषाने ७१ वर्षीय ज्येष्ठ महिलेची ६० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिल्डरसह त्याच्या कुटुंबियावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रमिला ईश्वरसिंग गुप्ता (७१, रा. औंध बाणेर लिंक रस्ता, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार द्वारका नारायण जालान, सुद्धा द्वारका जालान, विजय जालान, संजय जालान, समीर जालान आणि प्रिया जालान (सर्व रा. भांडारकर रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. ही घटना एप्रिल २००८ पासून ते १५ फेब्रुवारी या काळात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका जालान यांच्याकडे केंद्र, राज्य सरकार तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील गुंतवणुकीबाबत कुठलाही परवाना नसताना फिर्यादी प्रमिला गुप्ता आणि त्याच्या पतीला गुंतवणुकीचे आमिष दाखून ६० लाख रुपये घेऊन १ टक्का व्याज देण्यात येईल, असे सांगितले. मात्र, द्वारका जालान यांनी फिर्यादी प्रमिला गुप्ता आणि त्यांच्या पतीची मूळ रक्कम अथवा व्याज परत न ६० लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड करत आहेत.

Web Title: 60 lakh fraud of a senior woman with the lure of investment; A case has been registered against the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.