शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Scholarship List 2024: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी पात्र

By प्रशांत बिडवे | Updated: July 2, 2024 18:02 IST

यंदा इयत्ता पाचवीचे १६ हजार ६९१ आणि आठवीचे १४ हजार ७०३ असे एकुण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले

पुणे: राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयाेजित केलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षांचा अंतिम निकाल मंगळवार दि. २ जुलै राेजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. यंदा इयत्ता पाचवीचे १६ हजार ६९१ आणि आठवीचे १४ हजार ७०३ असे एकुण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डाॅ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.             इयत्ता पाचवी तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे रविवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ राेजी आयाेजन केले हाेते. परीक्षेचा तात्पुरता अंतरिम निकाल ३० एप्रिल राेजी जाहीर करण्यात आला हाेता. त्यानंतर मागील दाेन महिन्यांपासून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी केव्हा प्रसिद्ध हाेणार ? याची परीक्षार्थी विद्यार्थी आणि शिक्षक वाट पाहत हाेते. अखेर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या मंगळवारी दि. २ जुलै राेजी ऑनलाईन माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सायंकाळी ४ नंतर परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येतील. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे बॅंक खाते व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय गुणपत्रक पाहणे तसेच डाउनलोड करता येणार नाही. छापील गुणपत्रक शाळांना पाठविण्यात येतील असेही परिषदेने स्पष्ट केले.

शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षांचा अंतिम निकाल ही जाहीर केला असून परिषदेच्या वरील संकेतस्थळावर पाहता येईल.

परीक्षेचे नाव : परीक्षा दिलेले विद्यार्थी / पात्र विद्यार्थी / शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ( उत्तीर्ण टक्का )इयत्ता ५ वी : ४ लाख ९२ हजार ३७३ / १ लाख २२ हजार ६३६ / १६ हजार ६९१ (२४.९१)इयत्ता ८ वी : ३ लाख ६८ हजार ५४३ / ५६ हजार १०९ / १४ हजार ७०३ (१५.२३ )

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSocialसामाजिक