शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

नदीपात्रात असणार पुणे मेट्रोचे ५९ खांब; पर्यावरण रक्षणासाठी घेण्यात येतेय काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:07 PM

मुठेच्या पात्रात बहुचर्चित पुणे मेट्रोचे १६ ते २२ मीटर उंचीचे तब्बल ५९ खांब असणार आहेत. ते नदीला समांतर असे असतील. हे काम करताना पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेण्यात येत असून त्यासाठीच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहामेट्रो कंपनीने पर्यावरणशास्त्रतज्ज्ञांची एक टीमच केली तयारनदीपात्रातील प्राणी, पक्षी, अन्य जीवसंपदेला कसलाही त्रास होऊ नये, याची घेण्यात येतेय काळजी

पुणे : मुठेच्या पात्रात बहुचर्चित पुणे मेट्रोचे १६ ते २२ मीटर उंचीचे तब्बल ५९ खांब असणार आहेत. ते नदीला समांतर असे असतील. नदीवर आडव्या असणाऱ्या नव्या-जुन्या अनेक पुलांपेक्षा ते ७ ते १० मीटर उंच असणार आहेत. हे काम करताना पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेण्यात येत असून त्यासाठीच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे, असे महामेट्रो कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी ही माहिती दिली. नदीपात्रात काम करताना पूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यासाठी महामेट्रो कंपनीने पर्यावरणशास्त्रतज्ज्ञांची एक टीमच तयार केली आहे. त्यांच्या सूचना, तसेच पर्यावरणसंवर्धनाचे नियम पाळूनच हे काम केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. खोदकाम करताना जमिनीचा पहिला २० सेंटिमीटरचा थर काढून बाजूला जपून ठेवण्यात येत आहे. या थरातच जवैविविधता असते. काम संपले की हा थर पुन्हा तिथे बसवला जाणार आहे. नदीपात्रातून जे खांब जातील त्यांचा व्यास २ मीटर गुणिले २.५ मीटर किंवा त्यापेक्षाही कमी (आकारांमध्ये खांब आहेत) असणार आहे. नदीपात्रातून ते २२ मीटर उंचीवर असतील. नदीपात्रातील प्राणी, पक्षी व अन्य जीवसंपदेला कसलाही त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे. साप किंवा तत्सम काहीही सापडले तरीही न मारता ते इतरत्र सोडून देण्यास सांगण्यात आले आहे. पात्रातील २५ वृक्षांचा कामाला अडथळा होत आहे. ते काढावे लागतील, मात्र त्यातील १२ ते १५ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. अन्य वृक्षांच्या संख्येपेक्षा तीनपटीने त्याच जातीचे वृक्ष इतरत्र लावले जाणार आहेत, अशी माहिती बिऱ्हाडे यांनी दिली.  फेब्रुवारी महिन्यात वनाज येथून मेट्रोचे खांब जमिनीतून वर आलेले दिसतील. सहा ते आठ ठिकाणांचे फौंडेशन पूर्ण झाले आहे. जमिनीच्या साधारण साडेतीन ते साडेसहा मीटरवर कठीण खडक लागतो आहे. नदीपात्रातही अनेक ठिकाणी सहा मीटरवर खडक लागला आहे. सहा ते आठ खांबांचे काम एकावेळी होत आहे. कर्वे रस्त्यावरील कामही आता येत्या आठ दिवसांत सुरू होईल. त्यासाठी वाहतूक शाखेने परवानगी दिली आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीनेच काम होत आहे, असे बिऱ्हाडे म्हणाले. डेक्कनच्या पीएमपीच्या स्थानकाशेजारून मेट्रो जाणार आहे. त्यामुळे हे स्थानक मेट्रो स्थानकाला जोडून घेण्यात येईल. त्याशिवाय फर्ग्युसन रस्त्यावरून थेट डेक्कनपर्यंत एक अत्याधुनिक स्काय वॉक तयार करण्यात येणार आहे. तोही या स्थानकाला जोडला जाणार आहे. त्यामुळे तेथील मेट्रो प्रवासी अगदी आरामात या स्काय वॉकवरून ये-जा करू शकतील. वनाज ते रामवाडी या मार्गाचे काम गतीने होत आहे व त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे असे बिऱ्हाडे यांनी सांगितले. वनाज ते रामवाडी या मार्गावरील वनाज, आनंदवन, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे महाविद्यालय, डेक्कन, संभाजी उद्यान व महापालिका या आठ स्थानकांचे ५०० कोटी रुपयांचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. यातील वनाज, आनंदवन व आयडियल कॉलनी या तीन स्थानकांचे डिझाईन तयार आहे. त्यालाच प्राधान्य देण्यात आले असून हे कामही आता लवकरच सुरू होईल, असे बिऱ्हाडे म्हणाले.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे