शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई अंतर्गत राज्यात ५७ हजार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:10 IST

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात ...

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, येत्या ३१ जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदत दिली आहे. आतापर्यंत राज्यातील ८२ हजार १२९ जागांपैकी ५७ हजार ७३९ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, अद्याप सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. पुण्यात सर्वाधिक १० हजार ४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

राज्यातील ९ हजार ४३२ शाळांमधील आरटीईच्या ९६ हजार ६८४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. तब्बल २ लाख २२ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी निवड करण्यात आली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत प्रवेश मिळण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. शिक्षण विभागातर्फे वेळोवेळी प्रवेशासाठी मुदत देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ५७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला.

राज्यात आरटीई प्रवेशाच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १४ हजार ५६७ जागा आहेत. त्यातील १० हजार जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरटीईच्या केवळ चार हजार जागाच रिक्त आहेत. अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आरटीई प्रवेशावर बहिष्कार घालण्याचे जाहीर केले होते. मात्र, तरीही बहुतांश जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. परंतु, प्रवेशास मुदतवाढ द्यावी किंवा देऊ नये याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेतला जाईल, असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.

-----------------

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेले विद्यार्थी

जिल्हा जागा प्राप्त अर्ज लॉटरीतून दिलेले प्रवेश शाळेत झालेले प्रवेश

पुणे १४,७७३ ५५,८१३ १४,५७६ १०,०४५

मुंबई ५,२२७ १२,९११ ३,८२५ २,०८८

नाशिक ४,५४४ १३,३३० ४,२०८ ३,१५०

नागपूर ५,७२९ २४,१६७ ५,६११ ४,०७८

ठाणे १२,०७४ १८,९५६ ९,०८८ ६,१५३

जळगाव ३,०५६ ५,९३९ २,६९२ २,१७४

औरंगाबाद ३,६२५ ११,८१६ ३,४७० २,३५८

जालना २,२६२ ३,५८४ १,९१८ १,०१८

नांदेड १,७२० ५,३१८ १,६०४ १,००४

यवतमाळ १,२७५ ३,३९३ १,१५१ ८६५

बीड २,२२१ ३,९३८ २,०१२ १,३६०

भंडारा ७९१ २,०५१ ७८४ ६११

अकोला १,९६० ४,७७ १,८१७ १,४२८

अहमदनगर ३,०१३ ४,८२५ २,७५३ २,०४२

सोलापूर २,२३१ ४,२५२ १,७३८ १,०५०

कोल्हापूर ३,१८१ २,६४५ २,१३७ १,४४८

सातारा १,९१६ २,५०० १,५९५ १,०३९

सांगली १,६६७ १,४४६ ९८९ ७५८

--------------------------------------