पुण्यात ५५ वर्षाच्या सुनेचा ८० वर्षांच्या सासऱ्याकडून विनयभंग

By विवेक भुसे | Updated: July 16, 2022 17:34 IST2022-07-16T17:31:35+5:302022-07-16T17:34:50+5:30

सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल....

55-year-old daughter-in-law molested by 80-year-old father-in-law in Pune | पुण्यात ५५ वर्षाच्या सुनेचा ८० वर्षांच्या सासऱ्याकडून विनयभंग

पुण्यात ५५ वर्षाच्या सुनेचा ८० वर्षांच्या सासऱ्याकडून विनयभंग

पुणे : फौजदारी व कौटुंबिक न्यायालयात केसेस सुरु असताना सासरी आलेल्या ५५ वर्षाच्या सुनेचा ८० वर्षाच्या सासऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार प्रभात रोडवरील बंगल्यात शुक्रवारी घडला. याप्रकरणी पिंपळे सौदागर येथे राहणार्या ५५ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ८० वर्षाच्या सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासर प्रभात रोडला आहे. त्या पतीपासून काही वर्षांपासून वेगळ्या पिंपळे सौदागर येथे राहतात. त्यांच्यात फौजदारी न्यायालय व कौटुंबिक न्यायालयात ३ केसेस सुरु आहेत.

त्या शुक्रवारी दुपारी सासरी नांदण्यास व राहण्यासाठी जाण्यासाठी आणि पोटगी घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या ८० वर्षाच्या सासऱ्याने अडवून अश्लिल शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग केला, अशी फिर्याद दिल्याने डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 55-year-old daughter-in-law molested by 80-year-old father-in-law in Pune