शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

बनावट कागदपत्रांद्वारे कर्जप्रकरणात बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटींची फसवणूक

By विवेक भुसे | Updated: January 18, 2024 13:51 IST

निबंधक कार्यालयातील निबंधक, महाराष्ट्र बँक, डीबीएस बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुणे : सदनिका खरेदी व्यवहारात बनावट कर्ज प्रकरण तसेच दस्त नोंदणी करून बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बँक अधिकारी, दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी  नितीन राजाराम पाटणकर (वय ३५, रा. हातकणंगले, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), पुरुषोत्तम गजानन पाटणकर (वय ३८, रा. चिंचवड), मिलिंद गोसावी (वय ५०, रा. कात्रज), प्राची पाटणकर (रा. कोल्हापूर), विवेक शाम शुक्ला (रा. बिबवेवाडी), एका अनाेळखी व्यक्तीसह हवेली दुय्यम निबंध कार्यालयातील निबंधक, डीबीएस बँकेतील अधिकारी, कर्मचारी, बँक ऑफ महाराष्ट्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक सुभाष बाबूराव सणस (वय ६७, रा. सणस रेसीडन्सी, नाॅर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सणस बिल्डर्सकडून बांधण्यात येणाऱ्या लुल्लानगर येथील बेव्हरली हिल्स या गृहप्रकल्पापाचे कुलमुख्यातरधारक विठ्ठल नारायण भोरे यांच्या नावाने दोन सदनिका खरेदीसाठी अनोळखी आरोपीसह नितीन पाटणकर यांनी बनावट करारनामा केला. दस्त करून देणाऱ्या व्यक्तीस ओळखताे म्हणून आरोपी मिलिंद गोसावी, प्राची पाटणकर, विवेक शुक्ला यांनी स्वाक्षरी केल्याचे सणस यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हवेली (क्रमांक २०) दस्त नोंदणी कार्यालयातील निबंधकांनी कागदपत्रांची पडताळणी न करता दस्त नाेंदणीची प्रक्रिया केली. डीबीएस बँकेत कर्ज प्रकरण सादर करण्यात आले. बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्ज प्रकरणाची पडताळणी न करता सणस बिल्डर्सच्या नावे साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. सणस बिल्डर्सच्या नावाने बनावट खाते बँक ऑफ महाराष्ट्रात उघडण्यात आले. खात्यात जमा झालेली चार कोटी ३३ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. सणस बिल्डर्सचे कुलमुख्यारधारक विठ्ठल भोरे यांच्या नावाने दुसरीच व्यक्ती उभी करून बनावट करारनामा केल्याचे सणस यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सणस यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी अर्जाची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक तोडकरी तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा