Pune | आराेपीकडूनच घेतले ५० हजार रुपये, अलंकार पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 12:15 IST2023-03-11T12:10:35+5:302023-03-11T12:15:02+5:30
अरविंद शिंदे असे निलंबित उपनिरीक्षकाचे नाव आहे...

Pune | आराेपीकडूनच घेतले ५० हजार रुपये, अलंकार पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निलंबित
पुणे : आराेपीकडून ५० हजार रुपये घेणाऱ्या अलंकार पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी दिले. अरविंद शिंदे असे निलंबित उपनिरीक्षकाचे नाव आहे.
अरविंद शिंदेची डहाणूकर काॅलनी पोलिस चौकी येथे नियुक्ती आहे. घराच्या मालकीहक्कावरून एरंडवणे भागातील अलंकार पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल आहेत. याचा तपास शिंदे याच्याकडे सोपवण्यात आला नव्हता. तरीही शिंदे याने या प्रकरणातील आरोपीला मोबाइलवर संदेश पाठवून पोलिस चौकीत बोलवून घेतले. तसेच त्याला अटक करण्याची भीती दाखवत ५० हजार रुपये घेतले.
या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदेची चौकशी केली. चौकशीत तथ्य आढळल्याने, पोलिस दलाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी शिंदेला पोलिस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
--------