शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

जिल्ह्यातील ५ हजार ७६० सैनिक बजावणार मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 5:57 PM

सीमावर्ती भागात देशाचे संरक्षण करणाऱ्या  सैनिकांना काही कारणास्तव मतदान करता येत नाही

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने सी-डॅकच्या मदतीने ऑनलाईन मतपत्रिका पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : देशाच्या सीमेवरील सैनिकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून प्रथमच ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जात आहे. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघातील एकूण ५ हजार ७६० सैनिकांनी जिल्हा निवडणूक कार्यालयात यासाठी नोंदणी केली आहे. त्यात बारामतीमध्ये सर्वाधिक २ हजार २५५ सैनिक मतदार आहेत.  देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. मात्र, सीमावर्ती भागात देशाचे संरक्षण करणाऱ्या  सैनिकांना काही कारणास्तव मतदान करता येत नाही. पोस्टाने पाठविलेली मतपत्रिका मतमोजणीच्या तारखेपर्यंत पोस्टाने प्राप्त होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या मदतीने ऑनलाईन मतपत्रिका पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मतपत्रिका ऑनलाईन पाठविल्यामुळे सैनिकांना तात्काळ मिळतील. तसेच मतदान व मतमोजणी यात एक महिन्याचा कालावधी असल्याने पोस्टाने मतपत्रिका वेळेत पोहचणार आहेत. त्यामुळे सर्व सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यातच सध्या पुणे, बारामतीसह शिरूर व मावळ मतदार संघातील उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यामुळे या मतदार संघात येणाऱ्या सैनिक मतदारांना लवरकरच त्यांच्या कामाच्या ठिकाणी सीमावर्ती भागात मतपत्रिका पाठविल्या जाणार आहेत.शिरूर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या एकट्या आंबेगाव विधानसभा मतदार संघात ६४३ सैनिक मतदारांनी मतदानासाठी नोंदणी केली आहे. तर बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर विधानसभा मतदार संघात ६३८ सैनिक मतदार असून बारामती विधानसभा ५८६ सैनिक मतदार आहेत.मतदार संघ निहाय सैनिक मतदारांची आकडेवारी पुणे: वडगाव शेरी-४३७, शिवाजीनगर-९९ , कोथरूड-७६, पर्वती-४४, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड-९६, कसबा पेठ-३३. बारामती : दौंड-३०८, इंदापूर-२७७, बारामती-५८६, पुरंदर-६३८, भोर-३०४, खडकवासला-१४२.शिरूर : जुन्नर-२७६, आंबेगाव-६४३, खेड आळंदी-३५३, शिरूर-४२४, भोसरी-१४४, हडपसर-२०५.मावळ : पनवेल-१७०, कर्जत-६३, उरण-४१, मावळ-११२, चिंचवड-१५६, पिंपरी-१३३. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानIndian Armyभारतीय जवान