लवकरच साकार होणार मेट्रोची ५ स्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 06:00 IST2019-04-26T06:00:00+5:302019-04-26T06:00:06+5:30

सर्व स्थानकांची कामे जोरात सुरू असून मेट्रो मार्गांवरील खांबाचे कामही ७० टक्क्यांपर्यंत पुर्ण झाले आहे.

5 stations in metro soon to be realized | लवकरच साकार होणार मेट्रोची ५ स्थानके

लवकरच साकार होणार मेट्रोची ५ स्थानके

ठळक मुद्देकोथरूड, पौडच्या सौंदर्यात भर: डिसेंबर अखेर एका मार्गाला सुरूवातस्थानकांची रुंदी लांबी १४० मीटर आहे. रुंदी २१ मीटर व उंची जमिनीपासून १३ ते १५ मीटर

पुणे : मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील ५ उन्नत (इलेव्हेटेड) मेट्रो स्थानकांमुळे कोथरूड, पौड तसेच कर्वेरस्त्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या सर्व स्थानकांची कामे जोरात सुरू असून मेट्रो मार्गांवरील खांबाचे कामही ७० टक्क्यांपर्यंत पुर्ण झाले आहे. रंग, आकार तसेच प्रवाशांसाठीच्या सुविधा या सर्वच गोष्टींनी ही सर्व स्थानके  अतीशय आकर्षक असतील याची काळजी महामेट्रोने घेतली आहे.
वनाजजवळ मेट्रो चा डेपो आहे. वनाज स्थानक डेपोपासून वेगळे असेल. ते ३ टप्प्यांचे असणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यावर व्यावसायिक दुकाने, तसेच कार्यालये महामेट्रोच्याच वतीने तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर प्रवाशांसाठी प्रतिक्षा कक्ष, तिकीटे काढण्याची खिडकी अशी व्यवस्था असेल. तिसऱ्या मजल्याचा वापर फलाट (प्लॅटफॉर्म) म्हणून केला जाईल.
वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गाचे अंतर ५ किलोमीटर आहे. वनाज, त्यानंतर आनंदनगर, आयडियल कॉलनी व नळस्टॉप व गरवारे महाविद्यालय अशी ५ स्थानके या मार्गावर असतील. वनाजचे स्थानक तीन मजली तर अन्य चारही स्थानके २ मजली आहेत. तिथे पहिल्या मजल्यावर तिकीट काढण्याची व्यवस्था व दुसऱ्या मजल्यावर प्लॅटफॉर्म असेल.  
स्थानकांची रुंदी लांबी १४० मीटर आहे. रुंदी २१ मीटर व उंची जमिनीपासून १३ ते १५ मीटर आहे. वनाज चे स्थानक थोडे जास्त उंच असेल. स्थानकात जाण्यायेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण ४ व्यवस्था असतील. त्यात एक व्यवस्था दिव्यांग, वृद्ध यांच्यासाठी लिफ्टची आहे. दुसरी व्यवस्था सरकत्या जिन्यांची (एक्सलेटर) आहे. त्याशिवाय स्थानकाला लागूनच नेहमीचे साधे जिनेही असतील. पदपथावरून प्रवाशांना या तिन्हीपैकी एका व्यवस्थेने स्थानकात जाता किंवा येता येईल. 
सर्व स्थानकांना आकर्षक रंग असतील. मेट्रो चा मार्ग मध्यभागी व त्याच्या भोवती संपुर्ण रस्ता वरच्या बाजूने व्यापलेले स्थानक अशी स्थानकांची रचना आहे. उंचावर असल्यामुळे ही सर्व स्थानके दुरूनही दिसतील ही बाब लक्षात घेऊन त्यांना आकर्षक आकार देण्यात आले आहेत. स्थानकाच्या बरोबर मधून मेट्रो बाहेर पडेल किंवा आतमध्ये जाईल. 
कोथरूड, पौड तसेच वनाज हा भाग म्हणजे गेल्या काही वर्षात वेगाने विकसीत झालेली पुण्याची उपनगरे आहेत. त्यामुळे हे तिन्ही रस्ते आता पुण्याच्या मध्यभागाला जोडणारे प्रमुख रस्ते झाले आहेत. त्याच्या आजूबाजूला मोठ्या वसाहतींच्या आकर्षक इमारती उभ्या राहिल्या आहेत. या रस्त्यांच्या सौंदर्यात आता या ५ स्थानकांमुळे मोठी भर पडणार आहे. डिसेंबर २०१९ मध्ये हा वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्ग सुरू करण्याचे महामेट्रो कंपनीने जाहीर केल्यामुळे सध्या या मागार्चे तसेच त्यावरील स्थानकांचे काम वेगाने सुरू आहे. 
----------------------------
असा आहे मेट्रो मार्ग
-- मेट्रो मागार्ची रूंदी - १० मीटर
-- मार्गावरील दोन मेट्रोंची (येणाºया व जाणाºया) रुंदी-  प्रत्येकी ३ मीटर 
------------------
असे असेल मेट्रो स्थानक
-- स्थानकाची लांबी - १४० मीटर
-- स्थानकाची रुंदी- २१ मीटर
-- जमिनीपासूनची उंची- १३ ते १५ मीटर
-- प्रत्येक १ किलोमीटरवर स्थानक

Web Title: 5 stations in metro soon to be realized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.