शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

टँकरच्या शुल्कात ५ टक्के वाढ, पुणेकरांना उन्हासह दरवाढीची झळ, महापालिकेचे नवे दर जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 19:05 IST

महापालिकेच्या टँकर पाॅइंटवर ६९९ रुपये पास काढून भरलेला टँकर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने दीड ते दोन हजारांमध्ये विकला जातो

पुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याच्या टँकरची मागणीही वाढत असतानाच आता महापालिकेने टँकरच्या दरामध्ये गतवर्षीपेक्षा पाच टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या उन्हासह पाण्याच्या टँकरच्या दरवाढीच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल ८७ हजार ८८८ टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मार्च महिन्याचा विचार करता गतवर्षी ३८ हजार २९९ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. त्यात ९ हजार ५९७ टँकरची भर पडून एका महिन्यात ४७ हजार ८९६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे महापालिकेकडून खडकवासला धरणासह भामा आसखेड धरणातून पाणी उचलले जाते. ज्या परिसरात कमी पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतु:श्रृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत.

यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी वाढलेली आहे. मागील वर्षी मार्च २०२४ महिन्यात टँकरच्या ३८ हजार २९९ फेऱ्या झाल्या होत्या. त्यात यंदा मार्च २०२५ मध्ये ९ हजार ५९७ वाढ झाली असून एका महिन्यात ४७ हजार ८९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

दरम्यान, उन्हाच्या झळा आणि टँकरची मागणी वाढत असताना महापालिकेने टँकरच्या दरामध्ये पाच टक्के वाढ केली आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने नागरिकांची लूट करणारे टँकर माफियाही आपल्या दरामध्ये वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हासह टँकरच्या दरवाढीचाही चटका सहन करावा लागणार आहे.

टँकरचे दर

- दहा हजार लिटरपर्यंत - जुना दर ६६६ रुपये - नवीन दर ६९९ रुपये- दहा हजार ते पंधरा हजार लिटरपर्यंत - जुना दर १०४८ रुपये - नवीन दर ११०१ रुपये- पंधरा हजार लिटरपेक्षा जास्त - जुना दर १४७८ रुपये - नवीन दर १५५२ रुपये- महापालिकेचा टँकर असल्यास (नागरिकांसाठी) दहा हजार लिटरपर्यंत - जुना दर ११८२ रुपये - नवीन दर १२४१ रुपये

टँकर माफियांकडून लूट

महापालिकेचे सुमारे साडेपाचशे टँकर असून, खासगी दोनशे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. साधारणपणे उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरची मागणी वाढते. यंदाही उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याच्या टँकरची संख्या वाढलेली आहे. महापालिकेच्या टँकर पाॅइंटवर ६९९ रुपये पास काढून भरलेला टँकर किती किंमतीमध्ये विक्री करावा, यावर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्यामुळे एक टँकर दीड ते दोन हजारांमध्ये विकला जातो. त्यामुळे टँकरमाफियांची लॉबी तयार झाली असून, त्यांच्याकडून गरजू नागरिकांची लूट केली जाते.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीMONEYपैसाDamधरणFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजन