खासगी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला डुलकी पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:16 IST2020-12-11T17:15:15+5:302020-12-11T17:16:59+5:30
फिर्यादी हे 9 डिसेंबरला ते नगर ते पुणे बसने प्रवास करत होते.

खासगी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला डुलकी पडली महागात
पुणे : खासगी कुरिअर सर्व्हिस मध्ये पार्सल डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला एसटी बसमध्ये लागलेली डुलकी महागात पडली. त्याच्याकडील ५ लाख ५० हजार रूपयांची रक्कम असलेली बँग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी आरामदायी एस.टी बसप्रवासात घडली आहे.याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर विठ्ठल मुळीक (वय 24 वर्षे रा. खिस्त गल्ली कापड बाजार,अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयूर हा एका खासगी कुरिअर सर्व्हिस कंपनीत कामाला आहे. 9 डिसेंबरला ते नगर ते पुणे बसने प्रवास करत होते. नगरमध्ये कुरिअर सर्व्हिसची जमा झालेली ५ लाख ५० हजार रूपयांची रक्कम होती. प्रवासादरम्यान त्यांना डुलकी लागली. त्यांनी डोक्याखाली ठेवलेली बँग अज्ञात चोरांनी लंपास केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी तपास करीत आहेत.
------------------------------------------------------------------