Pune Crime | विश्रांतवाडीमध्ये ५ किलो गांजा जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 08:47 IST2022-12-19T08:47:00+5:302022-12-19T08:47:46+5:30
गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली...

Pune Crime | विश्रांतवाडीमध्ये ५ किलो गांजा जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पुणे : विश्रांतवाडी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून पाच किलो गांजा जप्त केला. संकेत सुनील साठे (वय २५, रा. मोशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
विश्रांतवाडीतील धानाेरी भागात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून अटक केली. त्याच्याकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली. बॅगेत गांजा आढळून आला. साठे याच्याकडून गांजा आणि मोबाइल असा १ लाख ७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे आदींनी ही कारवाई केली.