शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोगीच्या निवडणुकीसाठी ४६ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:10 IST

निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कळस : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ...

निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

कळस : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पळसदेव गट व महिला राखीव तसेच ओबीसी गटात जागाप्रमाणेच अर्ज प्राप्त झाल्याने ६ जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत. त्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कारखान्याच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये इंदापूर, कालठण, पळसदेव, भिगवण, शेळगाव या पाच गटांमधून प्रत्येकी ३ संचालक, भटक्या जमाती प्रवर्ग १, मागास प्रवर्ग १, अनुसूचित जमाती १, महिला राखीव २ आणि ब वर्ग १ असे एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

यामध्ये शेळगाव गट ५, भिगवण गट १०, कालठण गट ९, पळसदेव गट ३, इंदापूर गट ९, अनुसूचित जाती जमाती गट २, विमुक्त जाती २, ओबीसी १, महिला २, ब वर्ग ३ असे एकूण २१ जागांसाठी ४६ अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामुळे पळसदेव गट ३ व महिला राखीव २, तसेच ओबीसी गटामधून १ अशा सहा जागांसाठी सहाच अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत.

माजी सहकार मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज कालठण गट व ब वर्गामधून २ आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तसेच पाटील यांचे समर्थक वसंत मोहोळकर यांनीही ब वर्ग मधून अर्ज दाखल केला आहे.

सोमवार दि. २७ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी असून माघार घेण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर आहे. त्यामुळे अंतिम चित्र त्याचदिवशी स्पष्ट होणार आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. पी. गावडे यांनी कामकाज पाहिले.