शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

शेती नुकसानीची ४३ कोटी भरपाई प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतरही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आणखी ४३ कोटी रुपये सरकारने अजून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतरही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आणखी ४३ कोटी रुपये सरकारने अजून दिलेले नाहीत. कृषी विभागाने राज्य सरकारकडे याची मागणी केली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील २ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर शेतमाल आणि जमिनीच्या नुकसानीपायी ८७ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. यातल्या ४४ कोटी रुपयांचे वाटप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झाले आहे.

कृषी, तसेच महसूल विभागाच्या तालुका तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे त्वरित पाहणी करून नुकसानीचे पंचनामे तयार केले. राज्याकडून दिवाळीनंतर ४४ कोटी रुपये पाठवले. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने त्याचे वाटप केले. मात्र, ते पूर्ण करता आलेले नाही.

सरकारी नियमाप्रमाणे दोन हेक्टरसाठी नुकसानभरपाई मिळते. जिरायती व बागायतीला हेक्टरी १० हजार व फळपिकाच्या नुकसानीला हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळते. रक्कम अपुरी आल्याने प्रशासनाने सर्वच नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठीच मदत दिली आहे. पुढची रक्कम मिळाल्यानंतर दुसऱ्या हेक्टरचे वाटप करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

असे आहे जिल्ह्यातील नुकसान

जिरायती- २४ हजार ४७० हेक्टर

बाधित शेतकरी- ७३ हजार १३५

बागायती- ४८ हजार ८४० हेक्टर

बाधित शेतकरी- १ लाख १५ हजार ६७६

फळपिकांचे नुकसान -४ हजार ८४८ हेक्टर

बाधित शेतकरी- ९ हजार ९२७

जमिनीचे नुकसान -९१९ हेक्टर

बाधित शेतकरी - ४ हजार ३९३

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी -१ लाख ९८ हजार ७१८

मदतीसाठी एकूण निधीची मागणी - ८७ कोटी रूपये

प्राप्त निधी -४४ कोटी

मदतीचा लाभ मिळालेले शेतकरी -१ लाख

मदतीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी -९८ हजार ७१८.