शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 18:08 IST

नातेवाईकांनी मुलांचे मृतदेह पाहताच एकच हंबरडा फोडला, हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने नातेवाईकांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला

चाकण : पोहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा दमछाक होऊन बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवार (दि.३१) मे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.चाकणजवळील कडाचीवाडी (ता.खेड ) गावच्या हद्दीतील पाझर तलावात हा प्रकार घडला.स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने चाकण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओमकार बाबासाहेब हंगे (वय.१३ वर्ष,सध्या रा. मार्तंडनगर,मेदनकरवाडी,मूळ रा. हंगेवाडी,ता.केज,जि.बीड),श्लोक जगदीश मानकर (वय.१३ वर्षे,सध्या रा.मेदनकरवाडी,मूळ रा.धनवडी,ता.वरुड,जि.अमरावती),प्रसाद शंकर देशमुख( वय.१३ वर्षे,सध्या रा.मेदनकरवाडी,मूळ रा.अंबुलगा,ता.मुखेड,जि.नांदेड),नैतिक गोपाल मोरे ( वय.१३ वर्षे,सध्या रा.मेदनकरवाडी,मूळ रा. बुलढाणा झरी बाजार,ता.अकोट,जि.अकोला ) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, वरील चोघे जण शनिवारी राहत्या घरातून सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी गेले होते. चाकणजवळील कडाचीवाडी गावच्या हद्दीतील पाझर तलावामध्ये पोहण्यासाठी उतरले होते. पोहताना दमछाक होऊन या सर्वांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारपर्यंत हे चौघे जण घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. पाझर तलावाच्या काठावर त्यांच्या चपला व कपडे मिळून आल्या. स्थानिक नागरिकांसह आपदा मित्रांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. चाकण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. दरम्यान वरील चौघांचे मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले होते. नातेवाईकांनी मुलांचे मृतदेह पाहताच एकच हंबरडा फोडला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने नातेवाईकांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

पोटाच्या उदरनिर्वाहसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी या मुलांचे आई वडील राज्याच्या इतर जिल्ह्यातून चाकण या ठिकाणी आले होते. भाड्याने खोल्या घेऊन राहणाऱ्या चार ही कुटुंबातील मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने होत्याचे नव्हते झाले. मेदनकरवाडीचे माजी सरपंच महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर आदींनी चाकण ग्रामीण रुग्णालयात भेटी देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.रात्री उशिरा विच्छेदन झाल्यानंतर मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीEducationशिक्षणStudentविद्यार्थी