शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

भामा आसखेडच्या ३६७ प्रकल्पग्रस्तांना ३९ कोटींचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 13:14 IST

गेल्या अनेक वर्षांच्या संर्घषानंतर भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांना अखेर पैसे वाटप सुरु झाले आहे.

ठळक मुद्देपुणे शहराला लवकरच भामा आसखेडचे पाणी मिळणारसर्व कागदपत्रे सादर केल्यास दोन दिवसांत चेक

पुणे : शासनाच्या आदेशानुसार भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी १५ लाख या प्रमाणे पैसे वाटप  सुरु झाले असून, गेल्या चार महिन्यात सुमारे ३६७ प्रकल्पग्रस्तांना ३९ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अन्य ३७ लाभार्थ्यांचे चेक तयार असून, कौटुंबिक वादामुळे हे चेक घेण्यासाठी कोणी आले नाहीत. तर अन्य सर्व लाभार्थ्यांना फाईल सादर होईल तसे वाटप सुरु आहे. त्यामुळे पुणे शहराला लवकरच भामा आसखेडचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने भामा आसखेडचे लाभक्षेत्र रद्द करुन धरणातील पाणी साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केला. परंतु लाभक्षेत्र रद्द केल्यानंतर धरणामध्ये जमिनी केलेल्या शेतकऱ्यांच्या पुर्नवसनाबाबत त्यावेळच्या सरकारने कोणतही भूमिका जाहीर केली नव्हती. यामुळे खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणासाठी २००० मध्ये १ हजार ७०  हेक्टर जमीन संपादित केली होती. या धरणामुळे परिसरातील तब्बल १ हजार ६७३ शेतकरी कुटुंबे बाधित झाले आहेत. यापैकी २०१ शेतकऱ्यांनी शासनाने जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी यासाठी ६५ टक्के रक्कम भरली होती. त्यानुसार या २०१ खातेदारांना जमीन व पैशांच्या स्वरुपात मोबदला दिला आहे. परंतु जलसंपदा विभाग व पुनर्वसन विभाग यांच्यातील गोंधळामुळे आपल्याला १६/२ च्या नोटीसच देण्यात न आल्याने ३८८ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना त्वरित ६५ टक्के रक्कम भरून घेण्यासाठी १६/२ च्या नोटिसा देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गेल्या अडीच-तीन वर्षांत सरकार, जिल्हा प्रशासन आणि महापालिका अधिकारी यांनी वेळोवेळी बैठका घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु होता. अखेर याबाबत तोडगा काढण्यासाठी  जिल्हाधिकाऱ्यां ºयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुर्नवसन अधिकाऱ्यांनी खास प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला सादर केला. या प्रस्तावानुसार शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सहमतीनुसार प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला हेक्टरी १५ लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार ९ मे २०१९ पासून पात्र लाभार्थ्यांना पैसे वाटप सुरु आहे. यामध्ये एकूण ९०० लाभार्थ्यांपैकी ३६७ शेतकºयांना ३९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत शंभर टक्के शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येईल, असे जिल्हा पुर्नवसन अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.---एजंटांमुळे पैसे वाटपामध्ये अडचणगेल्या अनेक वर्षांच्या संर्घषानंतर भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांना अखेर पैसे वाटप सुरु झाले आहे. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांनी जमिनीच्या बदल्यात जमिन मिळण्यासाठी आंदोलन सुरु असून, बंद पाईपलाईनचे काम बंद करण्यात येत आहे. परंतु धरणाचेलाभक्षेत्र रद्द केल्याने शेतकऱ्यांना जमिन वाटप करण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळेच प्रशासनाकडून पैसे वाटप सुरु आहे. परंतु सध्या अनेक एजंट गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना भेटत असून, अधिक पैसे मिळून देण्याची अमिषे दाखवत आहेत. यामुळे सध्या पैसे वाटप करण्यात अडचण येत आहे.---सर्व कागदपत्रे सादर केल्यास दोन दिवसांत चेकभामा आसखेडच्या पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही एजंट अथवा अन्य कोणालाही न भेटत सर्व कागदपात्रासह जिल्हा पुनर्वसन कार्यालयामध्ये अर्ज केल्यास केवळ दोन दिवसांत चेक संबंधित लाभार्थ्यांच्या हाता दिला जाईल. यासाठी मूळ प्रकल्पग्रस्ताने समक्ष येऊन संमतीपत्र, शपथपत्र व ओळखपत्रासाठी आधारकार्ड द्यावे. प्रकल्पग्रस्त मयत असेल तर वारस दाखला दिल्यास संबंधित प्रकल्पग्रस्ताला दोन दिवसांत वाटपाचा चेक देण्यात येईल.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी