शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

वधूला उचलून नवदाम्पत्याने केल्या जेजुरी गडाच्या ३८० पायऱ्या सर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 15:08 IST

पुणे जिल्ह्यात जेजूरी येथील मार्तंड देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नवदाम्पत्य जात असतात. असेच एक मांजरीतील नवदाम्पत्य जेजुरीस गेले आणि अचानक नवरीला उचलून पूर्ण जेजुरी गड पायी सर करण्याचे ठरवले. 

ठळक मुद्देनवरदेवाने फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर शेअर केली क्लिप वयाच्या विसाव्या वर्षापासून जिम्नशियमची आवड असल्याने हे शक्य : सूरज उंद्रे

मांजरी : लग्न झाले की दुसऱ्या दिवशी कुलदैवताच्या दर्शनासाठी नवरदेव व नवरी जात असतात. पुणे जिल्ह्यात जेजूरी येथील मार्तंड देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नवदाम्पत्य जात असतात. असेच एक मांजरीतील नवदाम्पत्य जेजुरीस गेले आणि अचानक नवरीला उचलून पूर्ण जेजुरी गड पायी सर करण्याचे ठरवले. 
घुले कुटुंबातील असलेली कन्या सायली व उंद्रे कुटुंबातील असलेला चिरंजीव सूरज यांचा विवाह नुकताच झाला. जेजुरी गडावर जात असताना पाच पायऱ्या नववधूला उचलून चालण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. परंतु नवरदेवाने नवरीला चक्क गडाच्या संपूर्ण ३८० पायऱ्या उचलून घेऊन सर केल्या. त्यामुळे जाता येणारे भाविक या नवदाम्पत्यांकडे पाहुन कौतुक करत होते. नवरदेवाने फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर पूर्ण गड पार केलेली क्लिप शेअर केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत अनेक लोकांचे शरीरातील रचना स्थूलपणामुळे शरीर वाढलेले दिसते. त्यामुळे गड चढताना अनेकांना कसोटी करावी लागत आहे. अनेक लोक वेटलॉस (शरीराचे वजन कमी करण्यासाठी) डॉक्टरकडे, विविध प्रकारे आहारात डायटिंग करून संतुलित करताना दिसत आहे. एवढा गड वधूला घेऊन चढणे सोपी बाब नाही. परंतू वयाच्या विसाव्या वर्षापासून जिम्नशियमची आवड असल्याने हे त्याला शक्य झाले, असे सूरजने सांगितले. पाऊण तासात गड पार केला आणि तोही पाच दमात. 
गड चढल्यानंतर नवरदेवाचे हृदयाचे ठोके वाढले होते. दहा मिनिटे जागेवर थांबून विश्रांती घेतली व त्यानंतर भंडारा उधळून देवाचे दर्शन घेऊन खाली आलो, असे सूरज व सायली यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे