४० दुकानदारांकडून ३५ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:09 IST2021-04-18T04:09:06+5:302021-04-18T04:09:06+5:30

शिक्रापूर पोलीस व ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे. शिक्रापूर येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व शिक्रापूर ...

35 thousand fine recovered from 40 shopkeepers | ४० दुकानदारांकडून ३५ हजारांचा दंड वसूल

४० दुकानदारांकडून ३५ हजारांचा दंड वसूल

शिक्रापूर पोलीस व ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे. शिक्रापूर येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत गावांमध्ये नियमांचे उल्लंघन करत दुकाने सुरू ठेवून दुकानातील साहित्यांची विक्री करणाऱ्या ४० दुकानदारांवर कारवाई केली आहे. या वेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे, कृष्णा सासवडे, अंकुश घारे ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायकवाड, सिकंदर शेख, तुळजा माने, प्रकाश चव्हाण, प्रसाद वाडेकर उपस्थित होते.

बंदच्या काळात शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी करोना विरोधातील लढाईत मदत करण्याचे आवाहन यावेळी सरपंच रमेश गडदे यांनी केले.

--

फोटो क्रमांक : १७ शिक्रापूर दुकान कारवाई

फोटो ...नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना कारवाई करताना शिक्रापूर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन (धनंजय गावडे)

Web Title: 35 thousand fine recovered from 40 shopkeepers