शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

३४ गावांतील कर आकारणीबाबत शब्द पाळा; पालकमंत्री अजित पवार यांना सुप्रियाताईंचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 11:07 IST

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पुणे शहरातील विविध भागांमधील समस्यांसंदर्भात सुळे यांनी शुक्रवारी महापालिका भवनात बैठक घेतली...

पुणे : समाविष्ट गावांतील मिळकतधारकांना जादा कर लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी-चिंचवडप्रमाणे करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर करू, असे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. आता आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पुणे शहरातील विविध भागांमधील समस्यांसंदर्भात सुळे यांनी शुक्रवारी महापालिका भवनात बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, महापालिकेचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुळे म्हणाल्या, समाविष्ट गावातील मिळकतधारकांना जास्त कर लावण्यात आला आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी चिंचवडप्रमाणे करण्याचा निर्णय झाला आहे. पण त्याची अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्यासाठी नगरविकास विभागाकडेही पाठपुरावा करणार आहे. पालकमंत्र्यांनीही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. म्हाळुंगे, रावेत भागात ४० मजली इमारती उभ्या राहत आहेत. या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही, असे असताना प्रचंड वेगात बांधकामे होत आहेत. त्यामुळे पुण्याचे पाणी, कचरा, रस्ते यांचे तज्ज्ञांकडून ऑडिट होणे आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर होणार असे सुळे यांनी सांगितले.

कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम समन्वयाअभावी रखडले

‘महापालिकेत नगरसेवक नसल्याने नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणीच नाही, त्यामुळे समस्या गंभीर होत आहेत. या गावातील समस्यांवर मी दर महिन्याला बैठक घेऊन कामांचा पाठपुरावा करत आहे. कात्रज कोंढवा रस्ताच्या कामात महापालिका, राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्याने हे काम रखडले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

नगरसेवक नसल्यामुळे समस्या राहतात प्रलंबित

महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नसल्याने नागरिकांना हक्काची माणसेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपल्या कामांसाठी कोणाकडे जायचे, पाठपुरावा करायचा हेच त्यांचा समजत नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या प्रलंबित राहात आहेत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMuncipal Corporationनगर पालिकाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड