टाव्हरेवाडी येथे ३२ एकर ऊस जळाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:11 IST2025-02-04T15:10:16+5:302025-02-04T15:11:46+5:30

अवसरी : टाव्हरेवाडी येथे रविवारी (दि. २) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वीज तारांचे घर्षण होऊन सुमारे ३२ एकर उसाच्या ...

32 acres of sugarcane burnt in Tavrewadi | टाव्हरेवाडी येथे ३२ एकर ऊस जळाला 

टाव्हरेवाडी येथे ३२ एकर ऊस जळाला 

अवसरी : टाव्हरेवाडी येथे रविवारी (दि. २) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वीज तारांचे घर्षण होऊन सुमारे ३२ एकर उसाच्या क्षेत्राला आग लागली. शेतकऱ्यांच्या तत्परतेने १६ एकर ऊस वाचविण्यात यश आले आहे.

टाव्हरेवाडी गावचे हद्दीत असणाऱ्या चिंतामणी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ उसाचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. नदीच्या काठी असल्याने या परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते, आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विजेच्या तारांवर कावळे बसल्याने तारांचे एकमेकांना घर्षण होऊन शॉक सर्किट झाले, त्यामुळे विजेचे लोळ उसावर पडून उसाला आग लागली. सुमारे ३२ एकर ऊस या आगीच्या झळा लागून जळाला असता; परंतु शेतकऱ्यांच्या तत्परतेने १६ एकर ऊस वाचविण्यात यश आले आहे.

याआगीत बाबाची ज्ञानेश्वर बांगर यांचा दोन एकर, रोहिदास बन्सी पोखरकर यांचा एक एकर, प्रकाश दगडू पोखरकर यांचा एक एकर, बजरंग दगडू पोखरकर यांचा दीड एकर, गबाजी विठोबा पोखरकर यांचा एक एकर, रंजना अशोक थोरात यांचा तीन एकर, बबन यांचा दीड एकर, सतू गणाजी बांगर यांचा चार एकर असा ऊस जळाला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी बापू टाव्हरे, नितीन टाव्हरे, काळूराम शिंदे, बजरंग पोखरकर, बाबाजी बांगर, प्रकाश पोखरकर, प्रल्हाद मोरडे, अरुण टाव्हरे, सुरेश टाव्हरे, दिलीप पारधी, बाळा पारधी यांनी प्रयत्न करून इतर असणारा सोळा एकर ऊस वाचविला आहे.

Web Title: 32 acres of sugarcane burnt in Tavrewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.