लोणी काळभोरमध्ये ३० वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या, दोन दिवसातील तिसरी घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 05:57 PM2024-04-13T17:57:56+5:302024-04-13T17:58:30+5:30

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे....

30-year-old youth ended life in Loni Kalbhor, third incident in two days | लोणी काळभोरमध्ये ३० वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या, दोन दिवसातील तिसरी घटना 

लोणी काळभोरमध्ये ३० वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या, दोन दिवसातील तिसरी घटना 

लोणी काळभोर (पुणे) : लोणी स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने बाभळीच्या झाडाच्या फांदीला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनव्हेरा स्कूलजवळ असलेल्या तुकाई नर्सरीच्या बाजूला शनिवारी (दि. १३) सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. आश्विन बाळासाहेब गायकवाड (वय ३०, रा. शिवाजीराव भोसले बँकेजवळ, लोणी स्टेशन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आश्विन गायकवाड हा कुटुंबीयांसोबत कदमवाकवस्ती येथील परिसरात राहत होता. सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलिसांना खबर मिळाली की, इनव्हेरा स्कूलजवळ तुकाई नर्सरीच्या बाजूला काटेरी झुडपांमध्ये बाभळीच्या झाडाच्या फांदीला साडीच्या साहाय्याने एका तरुणाने गळफास घेतला आहे. पोलिस त्या ठिकाणी गेले असता, सदर ठिकाणी त्याचा मित्र सुमित कृष्णप्रसाद शर्मा (वय ३०, रा. लोणी स्टेशन) व रुग्णवाहिकेचा चालक नितीन झोंबाडे यांनी त्याच्या गळ्यातील गळफास घेतलेली साडी काढत गायकवाड याला खाली घेतले. बेशुद्धावस्थेत असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आळंदी म्हातोबाच्या सरपंच सोनाली तुषार जवळकर यांचे अश्विन गायकवाड हे बंधू होत. पुढील तपास लोणी काळभोर करीत आहेत.

Web Title: 30-year-old youth ended life in Loni Kalbhor, third incident in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.