उंड्रीमध्ये कार-दुचाकीच्या भीषण अपघातात 3 वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:05 IST2021-11-01T17:03:58+5:302021-11-01T17:05:20+5:30
पुणे : शहरात दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये दुचाकीवरील आई-वडील गाडीवरून पडून जखमी झाले आहेत. ...

उंड्रीमध्ये कार-दुचाकीच्या भीषण अपघातात 3 वर्षीय मुलाचा मृत्यू
पुणे: शहरात दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये दुचाकीवरील आई-वडील गाडीवरून पडून जखमी झाले आहेत. या अपघातात त्यांचा 3 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झाल्याने 3 वर्षीय चिमुरड्याचा या अपघातात मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी सायंकाळी आठच्या सुमारास उंड्रीमधील कडनगर चौकामध्ये घडली.
या अपघातात जैद मोसीन मुजावर (वय 3 वर्षे, रा. जुनी सांगवी) या मुलाचा मृत्यू झाला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी मोसीन मुजावर यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून कार चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांची पत्नी आणि मुलगा जैद शनिवारी कोंढव्यात गेले होते.
मोसीन मुजावर हे सायंकाळी सातच्या सुमारात पत्नी व मुलाला घेऊन त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी उंड्रीतील कडनगर चौकात आल्यानंतर भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या जोरदार धडकेत दुचाकी फरफटत गेली. त्यात मुजावर आणि त्यांच्या पत्नीसोबत मुलगा गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या मुलाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हर्षदा दगडे करीत आहेत.