Pune News: हडपसर परिसरात ३ अपघाताच्या घटना; १ ठार, दोघे जखमी
By नम्रता फडणीस | Updated: March 8, 2024 17:28 IST2024-03-08T17:27:06+5:302024-03-08T17:28:04+5:30
हडपसर भागात मांजरीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आईसमवेत पायी चालत असलेल्या मुलाला मागून धडक...

Pune News: हडपसर परिसरात ३ अपघाताच्या घटना; १ ठार, दोघे जखमी
पुणे : वाहने भरधाव चालवून अपघातास निमंत्रण दिले जात आहे. याच प्रकारातून हडपसर मध्ये अपघाताच्या तीन घटना घडल्या. यात एकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. अधिक माहितीनुसार, हडपसर भागात मांजरीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आईसमवेत पायी चालत असलेल्या मुलाला मागून धडक दिल्याने मुलाच्या उजव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीवरून निखिल सुभाष जाधव (रा. आव्हाळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात दि. ६ मार्च रोजी रात्री १० वाजता झाला.
हडपसर भागातच आणखी एक अपघाताची घटना घडली. घराकडे जात असलेल्या २६ वर्षीय तरुणाला पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने तो पुलावरून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पूजन विश्वजित आढाव (वय २६), असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ प्रथमेश आढाव याने फिर्याद दिली आहे. हा अपघात दि. ४ मार्च रोजी रात्री १:३० च्या सुमारास घडला.
तिसरी घटना हडपसर येथील हांडेवाडी भागात घडली. रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एक ३२ वर्षीय व्यक्तीच्या उजव्या गालाचे हाड फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी मासूम असिफ अली सय्यद (वय ३२, सय्यदनगर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.