शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कापूरव्हाेळ-मांढरदेवी- सुरुर रस्त्यासाठी २७६ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

भोर: तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कापूरव्हेळ-भोर-मांढरदेवी-सुरुर या रस्त्याच्या कामाला २७६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील ३५ कोटी ...

भोर: तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कापूरव्हेळ-भोर-मांढरदेवी-सुरुर या रस्त्याच्या कामाला २७६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील ३५ कोटी वर्ग करण्यात आले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

आमदार थोपटे म्हणाले, कापूरव्होळ-मांढरदेवी-सुरूर या ५७ किमी लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी अंदाजित रक्कम सुमारे २७६ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार करुन शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता. हिवाळी अधिवेशनात प्रस्तावित केलेल्या कामाला पुरवणी मागणीत २७६ कोटी २५ लाख रुपयांचा निधीला मंजुरी मिळाली आहे. एक डिसेंबरला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या वर्षीच्या २०/२१ साठी अर्थसंकल्पात ३५ कोटी रु तरतूद करण्यात आली आहे. सदर रस्त्यामुळे मांढरदेवी आणि महाबळेश्वरला जाणे जवळ होणार असून यामुळे पर्यटनाला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भोर-कापूरव्होळ रस्ता अत्यंत अरुंद असून वेडीवाकडी वळणे आहेत. शिवाय साईट पट्ट्या खचल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे-झुडुपे वाढली आहेत. तीव्र उताराचा रस्ता आहे. यामुळे वारंवार अपघात घडत आहेत तर भोरपासून आंबाडखिंड घाट ते मांढरदेवी व वाई तालुक्यातील घाट रस्ता असून, अनेक भागांत रस्ता अरुंद असून घाटात मोठ्या प्रमाणात उतार असून डोंगराच्या भागातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी पडून रस्ता बंद होतो. यामुळे घाटातून पर्यटक येण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे अनेक पर्यटक पुणे-सातारा रस्ता मार्गाने सुरूर फाट्यावरून महाबळेश्वरला जाणेच पसंत करतात.

दरम्यान, भोर मांढरदेवी वाई हा राज्यमार्ग क्रमांक ११९ चे एशियन बँक डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रुंदीकरणाचे मजबुतीकरण,डांबरीकरण यामध्ये साखळी क्रमांक ७६ ते १३३ पॉइंट ७४० या लांबीतील ५७.७४० किलोमीटर काम प्रस्तावित करण्यात आले आहे. दहा मीटर रुंदीचा रस्ता होणार असून डांबरीकरण पृष्ठभागाची रुंदीकरण करून त्यावर बाजूने दीड मीटर रुंदीचे मुरमीकरण व पावसाळी गटारे काढण्यात येणार आहेत.

कापूरव्होळ भोर मांढरदेवी वाई हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच निविदा निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. सदरचा रस्ता विकसित झाल्यावर भोरमार्गे मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांना आणि महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांना पर्यायी आणि जवळचा रस्ता उपलब्ध होणार आहे

योगेश मेटेकर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग