पेट्रोलपंपावर जमा झालेले २७ लाख चोरट्यांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 15:43 IST2018-03-26T15:31:12+5:302018-03-26T15:43:45+5:30
पेट्रोल पंपाचा एक कर्मचारी आणि चालक पंपात जमा झालेली २७ लाख रुपयांची रक्कम बँक आॅफ इंडियाच्या भवानी पेठ शाखेमध्ये भरण्यासाठी घेवून जात होते.

पेट्रोलपंपावर जमा झालेले २७ लाख चोरट्यांनी लुटले
पुणे : पेट्रोल पंपावर जमा झालेले २७ लाख रुपये बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी लुटले आहे. बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील लाईट हाऊस समोर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.
दोन दुचाकीवरून येत चोरट्यांनी वॅगनआर (एम.एच-१२ डीई. ७०२३) कारमधील रक्कम चोरली. सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौकात 
दरम्यान, चोरट्यांनी चारचाकी अगदी दुभाजकाला चिटकून उभी केल्याने चालकाला खाली उतरता आले नाही. तसेच या परिसरात सीसीटीव्हींची संख्या देखील कमी असल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.