Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५५ जणांची कोरोनावर मात; तर २६६ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 18:42 IST2021-06-20T18:42:33+5:302021-06-20T18:42:40+5:30
सद्यस्थितीत शहरात २ हजार ५६३ सक्रिय रुग्ण

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५५ जणांची कोरोनावर मात; तर २६६ नवे रुग्ण
पुणे: शहरात रविवारी २६६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात २ हजार ५६३ सक्रिय रुग्ण आहेत.
आज विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार ५०० संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.९१ टक्के इतकी आहे. तर आज १७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १० जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ३७३ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ५३९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख १४ हजार ९१२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७५ हजार ८५४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६४ हजार ७६० जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५३१ जणांचा मृत्यू झाला आहे.