Pune FTII: पुण्यातील एफटीआयआय मध्ये 25 वर्षीय तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 17:40 IST2022-09-01T17:40:23+5:302022-09-01T17:40:41+5:30
एफटीआयआय मध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण

Pune FTII: पुण्यातील एफटीआयआय मध्ये 25 वर्षीय तरुणीची आत्महत्या
पुणे : पुण्याच्या एफटीआयआय मध्ये २५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कामाक्षी बोहरा (वय 25, मूळ उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा एफटीआयआय मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामाक्षी आज लेक्चरला आली नसल्यामुळे शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांना ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कामाक्षी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. वैफल्यग्रस्त असल्यामुळे तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने नैराश्यातून एफटीआयआय मध्ये आत्महत्या केली होती. आता ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे या शिक्षण संस्थेवर सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.