पुणे : विद्यार्थी वाहतूक करणारी बस विजेच्या खांबावर आदळून झालेल्या अपघाताप्रकरणीपोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. हडपसरमधील काळेपडळ परिसरात गुरुवारी (दि. २) अपघात झाला होता. या अपघातात विद्यार्थी जखमी झाले होते.
या प्रकरणी अमोल विनायक बोराटे (रा. महादेव मंदिराजवळ, काळेबोराटेनगर, हडपसर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी नंदकुमार जावळे यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी बसचालक विद्यार्थी वाहतूक करतो. हडपसरमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन बसचालक गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास निघाला होता. त्यावेळी काळेपडळ परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ बसचालकाचे नियंत्रण सुटले. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळली. बसमध्ये २५ ते ३० विद्यार्थी होते. बस खांबावर आदळल्यानंतर विद्यार्थ्यांना दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरधाव बस चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बसच्या धडकेत विजेचा खांब पूर्णपणे वाकला. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील करत आहेत.
Web Summary : A school bus carrying 25-30 students crashed into a pole in Pune's Hadapsar area, injuring some students. Police have filed a case against the bus driver for negligent driving. The bus lost control near Mhsoba Temple and collided with the electric pole.
Web Summary : पुणे के हडपसर इलाके में 25-30 छात्रों को ले जा रही एक स्कूल बस खंभे से टकरा गई, जिसमें कुछ छात्र घायल हो गए। पुलिस ने लापरवाही से गाड़ी चलाने के आरोप में बस चालक के खिलाफ मामला दर्ज किया है। म्हसोबा मंदिर के पास बस अनियंत्रित हो गई और बिजली के खंभे से टकरा गई।