Accident: स्पीड ब्रेकरवर तोल जाऊन २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 15:03 IST2022-05-24T15:03:15+5:302022-05-24T15:03:24+5:30
बाणेर रोडवरील घटना

Accident: स्पीड ब्रेकरवर तोल जाऊन २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुणे : दुचाकीवरुन जात असताना अचानक स्पीड ब्रेकरवर ब्रेक दाबल्याने तोल जाऊन पडून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. हजरतअली इस्लाम शेख (वय २२, रा. पिंपळे निलख) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना बाणेर रोडवरील कपिल मल्हार सोसायटीजवळ ३ मे रोजी दुपारी तीन वाजता घडली होती.
हजरत अली शेख हा दुचाकीवरुन दुपारी जात होता. उन्हामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. कपिल मल्हार सोसायटीजवळ वेगाने जात असताना अचानक स्पीड ब्रेकरवर त्याने ब्रेक दाबला. त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्याला नागरिकांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. चतु:श्रृंगी पोलिसांनी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यांना तो स्वत: पडून जखमी झाल्याचे दिसून आले.