आळंदीत २११ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:10 AM2021-09-18T04:10:44+5:302021-09-18T04:10:44+5:30

शिबिराचे उद्घाटन चऱ्होली ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वप्नाली मयूर पगडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सचिन पगडे, उद्योजक मयूर ...

211 people donated blood in Alandi | आळंदीत २११ जणांनी केले रक्तदान

आळंदीत २११ जणांनी केले रक्तदान

Next

शिबिराचे उद्घाटन चऱ्होली ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वप्नाली मयूर पगडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सचिन पगडे, उद्योजक मयूर पगडे, अध्यक्ष विनोद पगडे, माजी सरपंच रवींद्र थोरवे, ग्रामपंचायत सदस्य बंटीशेठ थोरवे, माजी सरपंच शिवाजीराव पगडे, माजी उपसरपंच कोंडीबा ठाकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला शंभुराजे सेवाभावी संस्थेच्या वतीने हेल्मेट व प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विनोद पगडे व त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. कोरोनाचे नियम पाळून शिबिर घेण्यात आले.

१७ आळंदी

आळंदीत रक्तदात्याला शंभुराजे सेवाभावी संस्थेच्या वतीने हेल्मेट देताना मान्यवर.

Web Title: 211 people donated blood in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.