तोरणा गडावर चढताना डोक्यात दगड पडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 19:43 IST2022-02-13T19:43:12+5:302022-02-13T19:43:24+5:30
डोक्याला जबर मार लागल्याने तरुण जागीच कोसळला

तोरणा गडावर चढताना डोक्यात दगड पडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू
मार्गासनी : तोरणा गडावर चढताना डोक्यात दगड पडुन २१ वर्षीय युवकाचा मृत्यु झाल्याची घटना वेल्हे तालुक्यात घडली आहे. ओम महेश कुमार भरमगुंडे( वय२१) असे त्या युवकाचे नाव आहे.
वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोरणा गडावर आज दि १३ रोजी हर्षल वाळके, ओम संगावार, रोहन जाधव, पूनम कोल्हे, मोहित काळे, ओम महेश कुमार भरमगुंडे असा सहा जणांचा ग्रुप सकाळी गड चढण्यासाठी गेला होता. ओम महेश कुमार भरमगुंडे हा एकटाच पुढे चालत चालला होता. त्याचे सर्व मित्र त्याच्यापासून दूर काही अंतरावर होते. अचानक एक दगड कोसळून ओमच्या डोक्यात पडला. डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच कोसळला. यावेळी येथे असलेल्या पर्यटकांनी 108 नंबर च्या गाडीला फोन केला. रुग्णवाहिका किल्ल्याच्या अर्ध्या भागापर्यंत येत होती. तोपर्यंत अक्षय पाटील या पर्यटकांनी या मुलास आपल्या पाठीवर बसवून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुदाम बांदल करीत आहेत