शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्ष त्यांनी कागदावर दाखवलं, आम्ही चार वर्षांत प्रत्यक्षात आणलं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 18:00 IST

रिंग रोड, मेट्रो असा कोणताही प्रकल्प नवीन नव्हता. परंतु, मागील सत्ताधाऱ्यांनी ते केवळ कागदावर ठेवले.

ठळक मुद्देखासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन श्रीमंतापासून ते फकिरापर्यंतच्या स्वप्नातलं शहर म्हणून पुण्याला विकसित करण्याचं स्वप्न

पुणे : पुण्याचा विकास करू म्हणून त्यांनी २० वर्ष कागदावर प्रकल्प दाखवले मात्र, भाजपने अवघ्या साडेचार वर्षांत ते प्रत्यक्षात आणल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता टीका केली. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यअहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, विजय काळे, भीमराव तापकीर, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे ते म्हणाले की, पंधरा वर्ष प्रलंबित असलेला पुण्याचा वाहतूक प्रश्न भाजपने मेट्रो आणून सोडवला.रिंग रोड, मेट्रो असा कोणताही प्रकल्प नवीन नव्हता. परंतु, मागील सत्ताधाऱ्यांनी ते केवळ कागदावर ठेवले.चोवीस तास पाणी योजनेतवर त्यांनी फक्त चर्चा केली. स्मार्ट सिटीचा पैसाही त्यांना योग्य वापरायचा नव्हता.गरीबापासून मध्यमवर्गीयांपर्यंत आणि श्रीमंतापासून ते फकिरापर्यंत सर्वांच्या स्वप्नातलं शहर म्हणून पुण्याला विकसित करण्याचं भाजपचं स्वप्न आहे. शिरोळे म्हणाले की, माझा हा कार्य अहवाल मी श्रद्धेय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित करतो.खासदार कामातून दिसला पाहिजे असा माझा प्रयत्न होता.याच प्रयत्नातून स्मार्ट सिटी, मेट्रो, पीएमआरडीए असे प्रकल्प मी शहरात आणले.

टॅग्स :Metroमेट्रोDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाanil shiroleअनिल शिरोळे