Pune News| विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल २ कोटींचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 14:25 IST2022-07-02T15:10:55+5:302022-07-02T14:25:01+5:30

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू...

2 crore fine collected from non-insect train passengers | Pune News| विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल २ कोटींचा दंड वसूल

Pune News| विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल २ कोटींचा दंड वसूल

पुणे :रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांकडून पुणेरेल्वे विभागाने २ कोटी ३ लाख १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, तसेच १३७ जणांना अनियमित प्रवासासाठी ७३ हजार रुपयांचा दंड, तर सामान बुक न करता, तसेच घेऊन जाणाऱ्या १५८ जणांकडून १८ हजार रुपयांचा दंड पुणे रेल्वे विभागातर्फे वसूल करण्यात आला. यावर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत एक लाख चार हजार ६८ केसेसमध्ये ७ कोटी ३ लाख ५० हजार रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमारसिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे.

प्रवाशांना विनंती करण्यात येते की, त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल अन्यथा तुरुंगात जावे लागेल असे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले.

Web Title: 2 crore fine collected from non-insect train passengers