लोकअदालतीत २ कोटी ३३ लाखांची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 01:46 PM2019-12-16T13:46:13+5:302019-12-16T14:03:13+5:30

या लोकअदालतीत पाणीपुरवठा, मालमत्ता व व्यवस्थापन, अतिक्रमण विभागाकडील केसेस

2 crore 33 lakhs recovery in public court | लोकअदालतीत २ कोटी ३३ लाखांची वसुली

लोकअदालतीत २ कोटी ३३ लाखांची वसुली

Next
ठळक मुद्देएकूण ६६३ ‘प्री लिटीगेशन’ केसेस विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालयाचे संयुक्त आयोजन

पुणे : पुणे महापालिका न्यायालयात विधि सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या लोकअदालतीत विविध विभागातील ‘प्री लिटीगेशन’ केसेसला नागरिकांनी प्रतिसाद दिला़. यावेळी विविध केसेसमध्ये पालिकेला थकीत असलेल्या तब्बल २ कोटी ३३ लाख ७० हजार रुपयांची वसुली करता आली़. या लोकअदालतीत पाणीपुरवठा, मालमत्ता व व्यवस्थापन, अतिक्रमण विभागाकडील एकूण ६६३ ‘प्री लिटीगेशन’ केसेस आल्या होत्या़. यात पाणीपुरवठा विभागाचे १ कोटी ५३ लाख, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे ५० लाख ७० हजार व अतिक्रमण विभागाचे २९ लाख रूपये असे सुमारे २ कोटी ३३ लाख ७० हजार रूपये वसूल झाले़. विधी विभागाच्या विधी सल्लागार अ‍ॅड. मंजूषा इधाटे यांनी संपूर्ण कामकाजाचे नियोजन केले़. न्यायाधीश म्हणून अ़ ब़ तहसीलदार, अनुराधा पांडुळे, अ. द. डांगे व श्रीमती गिरोडकर यांनी काम पाहिले़ अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यावेळी उपस्थित होते़. .........

ट्रकचालकाला मिळाली नुकसानभरपाई

 ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्या प्रकरणात १८ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. महालोकअदालतमध्ये हा निर्णय झाला. त्या चालकाने काही दिवसांपूर्वी ट्रक घेतला होता. च्तो स्वत: ट्रक चालवत होता. २९ ऑक्टोबर २०१६ रोजी पुणे-मुंबई रस्त्यावर खोपोलीजवळ त्याच्या ट्रकला समोरून पूर्णपणे राँग साईडने आलेल्या ट्रकने धडक दिली. त्यामध्ये चालकाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर त्याची पत्नी, मुलगी आणि आई-वडिलांनी अ‍ॅड. जी. पी. शिंदे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. च्श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल केला होता. मृत्यूसमयी तो ३८ वर्षांचा होता. त्याला ट्रकपासून १५ हजार रुपये निव्वळ नफा मिळत होता. त्याच्या अवलंबून असलेल्या कुटुंबाचा विचार करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी अ‍ॅड. जी. पी. शिंदे यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये दाखल केलेल्या दाव्यात केली होती.

...........

अपघातात झालेल्या शिक्षकाच्या मृत्यूप्रकरणात ५५ लाखांची भरपाई

 टेम्पोच्या धडकेत झालेल्या गंभीर अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाल्याप्रकरणात कुटुंबीयांना ५५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. महालोकअदालतमध्ये झालेल्या तडजोडीमध्ये यावर निर्णय झाला. मोटार अपघात न्यायप्रधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश पी. आर. अष्टुरकर, अ‍ॅड. अतुल गुंजाळ आणि अ‍ॅड. व्ही. यू. काळे यांच्या पॅनेल हा दावा निकाली काढला. अशोक राजू चव्हाण (रा. भोसरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांची पत्नी पौर्णिमा व मुलगा सोहम यांनी अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांच्यामार्फत नुकसानभरपाई मिळावी, यासाठी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. टेम्पोचे मालक आणि विमा कंपनी एचडीएफसी इर्गोच्या विरोधात हा दावा दाखल केला होता. अशोक हे ५ जानेवारी २०१७ रोजी दुचाकीवरून भोसरी-आळंदी रस्त्याने चालले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या टेम्पोने धडक दिली. अपघातानंतर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ते शिक्षक होते. त्यांचे ५० वर्षांचे होते. त्यांना दरमहा ५७ हजार रुपये पगार होता. याचा कुटुंबातील अवलंबत्वाचा विचार करून १ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी दाव्यात केली होती. विमा कंपनीच्या वतीने महेश शेगुरी यांनी काम पाहिले.

.. ...........

* अभियंता तरुणीच्या कुटुंबीयांना मिळाला आधार

भरपाई म्हणून मिळणार ३१ लाख ५० हजार : २९ डिसेंबर २०१७ रोजीचा दावा दाखल

नवले पुलाजवळ सिमेंट-कॉँक्रीटचा टॅँकर स्वीट मार्टमध्ये घुसून झालेल्या अपघातात अभियंता तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तरुणीच्या कुटुंबीयांना ३१ लाख ५० हजार रुपये देणार आहे. तिच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या दाव्यात महालोकअदालतमध्ये हा निर्णय झाला. स्वाती दामोदर ओरके असे तिचे नाव आहे. तिच्या आई-वडिलांनी अ‍ॅड. अनिल पटनी आणि अ‍ॅड. आशिष पटनी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे २९ डिसेंबर २०१७ रोजी दावा दाखल केला होता. टाटा एआयजी या विमा कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल केला होता. २९ वर्षांची स्वाती नुकतीच पुण्यात येऊन एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होती. प्रोबेशन पिरीयडवर कामाला होती. तिला दरमहा २३ हजार ७३५ रुपये पगार होता. घटनेच्या वेळी ती स्वीट मार्टमध्ये स्नॅक्स आणि ज्यूस घेण्यासाठी गेली होती. त्या वेळी दुकानात घुसलेल्या मिक्सरखाली ती आली. तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात अ‍ॅड. पटनी यांनी ३ मार्च २०१८ रोजी दाखल केलेल्या दाव्यात ३५ लाख रुपये भरपाई मागितली होती. मात्र, तडजोड करून हा दावा निकाली निघाला.

Web Title: 2 crore 33 lakhs recovery in public court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.